Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

निवडुंगे येथील घटना । शेतात काम करताना कोसळले; उपचारापूर्वीच मृत्यू

पाथर्डी । वीरभूमी- Apr 21, 2026 • 12:16 PM 339 views
तालुक्यातील वाढत्या उन्हाचा कडाका जीवघेणा ठरत असून, तालुक्यातील निवडुंगे येथे उष्माघाताने एका तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राधाकृष्ण रामचंद्र मरकड (वय 33) असे मृत तरुण शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मरकड कुटुंबाचा शेती व्यवसाय असून शेतीची कामे करत असताना तापमान 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान गेले होते. कडक उन्हात काम करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर चक्कर येऊन ते शेतातच कोसळले. ही बाब लक्षात येताच इतरांनी तत्काळ धाव घेतली. त्यांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले.

प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले, अशी माहिती उपस्थितांकडून मिळाली.

यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून उष्माघात, निर्जलीकरण व थकव्याच्या तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण भागातील शेतमजूर व नागरिकांना दुपारच्या वेळेत काम करावे लागत असल्याने धोका अधिक वाढला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply