Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

92 व्या नारळी सप्ताहाची भव्य सांगता । महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या प्रभावी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध

पाथर्डी । वीरभूमी- Apr 08, 2026 • 03:50 PM 340 views
भक्तीरसात न्हाऊन निघालेला जनसागर, अध्यात्मिक ज्ञान देत समाजातील अनिष्ट प्रथांवर आसूड ओढणारे महंतांचा सप्ताहातील उपदेश, आणि भगवानगडाला धर्मज्ञानपीठाबरोबरच शक्तीपीठ म्हणून भाविकांनी दिलेली मान्यता-या सर्वांच्या साक्षीने भगवानगडाच्या 92व्या नारळी सप्ताहाची बडेवाडी येथे संत-महंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सांगता झाली.

सप्ताहाच्या सांगतेला वारकरी संप्रदायिकांसह भगवान भक्तांच्या भक्तीप्रदर्शनाने संपूर्ण तालुका भारावून गेला. गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांचा प्रति ज्ञानेश्वर असा उल्लेख होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.

तालुक्यातील या सप्ताहाच्या सांगतेसाठी माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार निलेश लंके, आमदार मोनिका राजळे, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, प्रभावती ढाकणे, बाळासाहेब आजबे, ज्येष्ठ कार्यकर्ते दादासाहेब मुंडे, बाळासाहेब सानप, प्रा. लक्ष्मण हाके, राधाताई सानप महाराज, रामगिरी महाराज, गडाचे उत्तराधिकारी कृष्णा महाराज शास्त्री यांच्यासह बीड व अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.

पाथर्डी आगाराने यंदा प्रथमच सप्ताहासाठी जादा बसेस उपलब्ध करून दिल्या. सोमवारी रात्री महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराजांच्या कीर्तनाला ऐतिहासिक गर्दी जमली.

यावेळी बोलताना शास्त्री महाराज म्हणाले, वारकरी संप्रदायाने अंधश्रद्धा कधीही जोपासली नाही. आतापर्यंत गडाला तीन मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन विकासकामांना सहकार्य केले आहे. ऊसतोड कामगारांनी कष्ट करून गडावरील ज्ञानेश्वर मंदिराच्या दगडी कामासाठी 13 कोटी रुपये दिले, तर धनंजय मुंडे यांनी दोन कोटी रुपये दिले आहेत.

चार कोटी रुपयांचे अत्याधुनिक महाप्रसादगृह लवकरच सुरू होणार असून गडाचा इतिहास आणि अध्यात्मिक परंपरा नव्या पिढीने अभ्यासपूर्वक जाणून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

वारकरी संप्रदाय हा समाजाचा दिशादर्शक असून भगवान बाबांनी त्यांच्या जीवनकार्याद्वारे समाजाच्या बौद्धिक, नैतिक, सामाजिक आणि धार्मिक उन्नतीसाठी आयुष्य वेचले. त्यामुळेच त्यांच्या विचारांचे अनुयायी समाधानी जीवन जगत आहेत. भगवानगड हीच धार्मिक विचारांची चळवळ भविष्यात अधिक व्यापक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धनंजय मुंडे म्हणाले, शंभर घरांचे बडेवाडी गाव एवढ्या भव्य प्रमाणात सप्ताहाचे यशस्वी आयोजन करते, हाच भगवान बाबांचा चमत्कार आहे. लाखो लोक शिस्तीत आणि महंतांच्या आदेशानुसार वागताना फक्त या सप्ताहात दिसतात.

नामदेव शास्त्री यांचे ज्ञानेश्वरीवरील सखोल आणि चिकित्सक निरूपण त्यांना ज्ञानाचे ऐश्वर्य प्राप्त करून देते. देशात त्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकण्याचा मान वेगळाच आहे. भगवानगडावरील संत ज्ञानेश्वरांचे भव्य मंदिर जगात अद्वितीय ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

वारकरी संप्रदायाने कधीही अंधश्रद्धा जोपासली नाही. निर्मळ व स्वच्छ भक्ती हीच श्रेष्ठ ठरते. हीच शास्त्रीजींची शिकवण आहे. अध्यात्माच्या माध्यमातून भगवानगडाने विशेषतः शास्त्रीजींनी संपूर्ण राज्याला व राज्यातील ग्रामीण भागाला दिशा दिली. सर्वांचे प्रेरणास्थान म्हणून गड नावारूपाला आणण्यात शास्त्रीजींनी मिळवलेले यश ही सुद्धा भगवान बाबांची कृपा शक्ती आहे. वसु जळगाव येथे पुढील वर्षी होणार्‍या सप्ताहाला जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहण्याचा आपण प्रयत्न करू. शास्त्रीजींचा सहवास ऊर्जा प्रदान करणारा व मनःशांती देणारा ठरतो.

अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांनी शास्त्री महाराजांच्या विद्वत्तेचे कौतुक करत राज्याला त्यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. गड आता स्वयंपूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

शास्त्रींचा मोलाचा उपदेश
महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी अध्यात्मिक क्षेत्रातील भोंदूगिरीवर टीका करत भाविकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. अंधश्रद्धा ठेवू नका, शिका, विचार करा-ज्ञानच तुम्हाला तारेल, असा संदेश त्यांनी दिला. भक्ती, शिस्त, सेवा आणि अध्यात्मिक उर्जेचा संगम असलेल्या या सप्ताहाने लाखो भाविकांना अंतर्मुख करत नवचैतन्य दिले.

बडेवाडीकरांची अडचणींवर मात
सुरुवातीचे दोन दिवस अवकाळी पावसाने सप्ताहामध्ये मोठे अडथळे आले. बडेवाडीसह पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी अत्यंत परिश्रम करत संपूर्ण सेट अप पुन्हा उभा केला. रखरखत्या उन्हातही सांगता समारंभासाठी हजारो भाविकांनी एलईडी वॉलवर कार्यक्रम बघितला. भगवान बाबांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. उत्साह, चैतन्य, श्रद्धा व सेवेचे दर्शन आज लाखो भाविकांना घडले. भाविकांना महाप्रसाद वाटपासाठी 22 ट्रॅक्टर पंगतीमध्ये फिरत होते.

कुटुंबप्रमुख म्हणुन माझी जबाबदारी ः मुंडे
सांगता कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे आणि बाळासाहेब सानप हेलिकॉप्टरने आले. जेसीबीमधून झालेल्या फुलवृष्टीने वातावरण भारावून गेले. गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबीयांची अनुपस्थिती लक्षात घेऊन शास्त्री महाराजांनी त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. त्यावर धनंजय मुंडे यांनी कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारत भूमिका स्पष्ट केली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply