Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध

विकास लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी । कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पाथर्डी । वीरभूमी- Apr 21, 2026 • 12:29 PM 418 views
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील संत-महंतांविषयी केलेल्या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पाथर्डी तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पाथर्डी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी हभप. गोविंद महाराज जाटदेवळेकर, हभप दिपक महाराज काळे, अ‍ॅड. नामदेव जायभाय, सोमनाथ बंग, प्रथमेश नाकिल आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, विकास लवांडे यांनी अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायातील पूजनीय संतांविषयी चुकीचे व अपमानास्पद विधान केले. त्यांनी ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज, ह.भ.प. गोसेवक संजय महाराज पाचपोर, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे, ह.भ.प. रामगिरीजी हराजानी तसेच ह.भ.प. गोविंदगिरीजी महाराज यांच्याबाबत संप्रदायामध्ये घुसखोरी असल्याचा आरोप केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असून अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, या प्रकारामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

यामुळे संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये विकास लवांडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीने पाथर्डी तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply