Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

दोन दिवसांत पाणी न मिळाल्यास अमरापूर येथे रस्ता रोको करण्याचा शेतकर्‍यांचा इशारा

शेवगाव । वीरभूमी - Apr 08, 2026 • 03:43 PM 299 views
मुळा पाटबंधारे विभागाअंतर्गत मुळा उजवा वितरिका क्रमांक 3 कलव्यामधून सोडण्यात आलेल्या उन्हाळी आवर्तनात टेलच्या भागाला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमरापूर उपविभागीय अधिकारी संदीप शेळके यांच्यावर टेल भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

वरील भागाकडे पाणी वळवले जात असल्यामुळे टेलच्या भागातील शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून शेतकर्‍यांच्या हातात तोंडाशी आलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.

पाणी वाटपासाठी टेल टू हेड हे धोरण असताना देखील आव्हाणे खुर्द, वडूले, अमरापूर, फलकेवाडी, भगूर या भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे.

पाणी प्रश्न हा शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून याकडे लोकप्रतिनिधी-आमदार, खासदार तसेच संबंधित अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत पाणी न आल्यास अमरापूर येथे आव्हाणे खुर्द, शहापूर, फलकेवाडी व अमरापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हा इशारा सद्गुरूआई पाणी वापर संस्थेचे चेअरमन देविदास काकडे, शंकरराव काकडे, संजय भुसारी, चंद्रकांत काकडे, किशोर सोंडे, किसन काकडे, दिलीप भुसारी, अशोक भुसारी, योगेश काकडे, निलेश काकडे, गणेश कमानदार, राजेंद्र काकडे, महादेव कमानदार, संतोष फटांगडे, कोंडीराम आहेर, नारायण लांडे, ऋषी पवार, बंडू औटी आदींनी दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply