Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल

भाजपाकडून अक्षय कर्डिले यांच्यासह राष्ट्रवादी श.प., काँग्रेस व वंचितने दिले उमेदवार

राहुरी । वीरभूमी - Apr 06, 2026 • 11:46 PM 1009 views
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्राजक्त तनपुरे यांची मनधरणी यशस्वी झाली. यामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अनपेक्षित माघार घेतली. मात्र राष्ट्रवादीने नवीन चेहर्‍याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. यामुळे भाजपासह राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षासह तब्बल 30 जणांनी 42 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. आज अखेर 30 जणांनी 42 अर्ज दाखल केले असून दि. 7 रोजी दाखल अर्जाची छाननी होणार आहे. तर 9 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होवून 23 एप्रिल रोजी मतदान व 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपाची उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. मात्र स्व. आ. शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. मात्र निवडणूक अपक्ष लढायची की पक्षाकडून या गोंधळात असलेले तनपुरे यांची भाजपाच्यावतीने मनधरणी करण्यासाठी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोमवारी सकाळी प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात पोहोचले. तनपुरे यांची मनधरणी करण्यात या दोन्ही नेत्याना यश मिळाल्याने अखेर तनपुरे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.

तनपुरे यांची चलबिचल पहाता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तनपुरे आणि गोविंद मोकाटे यांना एबी फॉर्म दिले होते. अपेक्षेप्रमाणे तनपुरे यांनी माघार घेतल्याने मोकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासह काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीनेही आपले उमेदवार दिले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे - गोविंद खंडू मोकाटे (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष), इब्राहिम अल्ताफ शेख (अपक्ष), बिलाल गफूरभाई शेख (अपक्ष), उमेश महादेव म्हेत्रे (अपक्ष), सुर्यभान दत्तात्रय लांबे (काँग्रेस), रावसाहेब सदाराम खेवरे (अपक्ष), अक्षय शिवाजीराव कर्डिले (भाजपा), संभाजी लक्ष्मण धोंडे (अपक्ष), नागेश विलास जाधव (अपक्ष), रविंद्र बापुसाहेब मोरे (अपक्ष), इम्रान नबी देशमुख (अपक्ष), बाळासाहेब सोमा जाधव (वंचित बहुजन आघाडी), संतोष एकनाथ चोळके (वंचित बहुजन आघाडी),

दत्तात्रय नारायण म्हैस (अपक्ष), त्रिशला मिलिंद कांबळे (अपक्ष), शिवाजी आनंदा कदम (अपक्ष), सखाहरी शांताराम बर्डे (अपक्ष), प्रवीण सुभाष दळवी (अपक्ष), नामदेव बंडू पवार (अपक्ष), अनिल भिकाजी जाधव (अपक्ष), सुदर्शन लक्ष्मण शितोळे (हिंदू एकता आंदोलन), बाळू बापुराव कोळसे (अपक्ष), साहेबराव पाटीलबा म्हसी (अपक्ष), अथर्व साहेबराव म्हसे (काँग्रेस), नंदकुमार भागवत खेमनर (अपक्ष), महेश केशव हापसे (अपक्ष), सोहम बापुसाहेब चिंधे (लोकशाही पार्टी), प्रतिमा किशोर देसर्डा (अपक्ष), सविता रामचंद्र शेटे (अपक्ष), शोएब सुथेदार शेख (अपक्ष) असे एकुण 30 जणांनी 42 अर्ज दाखल केले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply