Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार

प्राजक्त तनपुरेंची घेतली भेट । कर्डिले विरोधात उमेदवारी न करण्याची विनंती

अहिल्यानगर । वीरभूमी- Apr 06, 2026 • 12:47 PM 1304 views
माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट तनपुरे यांचे संपर्क कार्यालय गाठल्याने राहुरीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच आज भाजपाचा स्थापना दिवस असल्याने चव्हाण व विखे पाटील हे तनपुरे यांची कशाप्रकारे मनधरणी करतात हे लवकरच स्पष्ट होईल.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत स्व. आ. शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे विशेष लागले होते. त्यातच रविवारी तनपुरे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. मात्र निवडणूक ही अपक्ष लढवायची की, पक्षाकडून याचा निर्णय बाकी होता.

आज सोमवारी अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भरण्यात येणार होता. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर रविंद्र चव्हाण आणि विखे पाटील यांनी थेट प्राजक्त तनपुरे यांचे संपर्क कार्यालय गाठत तनपुरे यांच्याशी चर्चा सुरु केली.

भाजपा महायुतीकडून तनपुरे यांनी कर्डिले यांच्या विरोधात उमेदवारी करु नये, यासाठी तनपुरे यांची मनधरणी करण्यासाठी हे दोन्ही नेते प्रयत्नशिल असल्याचे समजते. तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची एंन्ट्री झाल्यामुळे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

या भेटीनंतर तनपुरे काय निर्णय घेतात, यावर राहुरीची निवडणूक चुरशीची होणार की, एकतर्फी होणार याकडे लक्ष लागले आहे. अक्षय कर्डिले यांच्यासाठी प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहीले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply