Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

श्री रुक्मिणी सहकारी बँकेची दमदार कामगिरी; 7.38 कोटींचा ढोबळ नफा

निव्वळ नफा 3.20 कोटी । शून्य नेट एनपीए राखत आर्थिक सुदृढतेची नोंद

श्रीगोंदा । वीरभूमी- Apr 05, 2026 • 02:20 PM 679 views
स्थानिक पातळीवर विश्वासार्ह बँकिंग सेवा देणार्‍या श्री रुक्मिणी सहकारी बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 7.38 कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळवला आहे. सर्व तरतुदी केल्यानंतर बँकेचा निव्वळ नफा 3.20 कोटी रुपये इतका झाला असल्याची माहिती व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग विठ्ठल गुंड यांनी दिली.

अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात एकूण दहा शाखा असून संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेने चेअरमन सी.ए. वसंतराव बापूराव गुंड व व्हाइस चेअरमन सी.ए. सुरेश रावसाहेब गावडे यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय प्रगती साधली आहे. मुख्य अधिकारी प्रदीप जालिंदर जगताप आणि सुनिल नामदेव जगताप यांच्या सक्षम प्रशासकीय कामकाजामुळे बँकेने ही यशस्वी झेप घेतली आहे.

दि. 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील अहवालानुसार, बँकेने केवळ नफ्यातच नव्हे तर एकूण व्यवसायवाढीतही भरीव प्रगती साधली आहे. बँकेकडे सध्या 223.07 कोटी रुपयांच्या ठेवी असून 156.01 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. याशिवाय बँकेची गुंतवणूक 100.59 कोटी रुपये असून एकूण एकत्रित व्यवसाय 379.08 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

बँकेचा भांडवल पर्याप्तता प्रमाण 23.62 टक्के असून पीसीआर 102 टक्के आहे. विशेष म्हणजे, उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर बँकेने आपला नेट एनपीए शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे, ही बाब बँकेच्या आर्थिक सुदृढतेची साक्ष देणारी आहे. यावर्षी बँकेने 1.48 कोटी रुपयांचा आयकर भरला असून सभासदांना नियमित लाभांश देण्याची परंपराही कायम ठेवली आहे.

पारदर्शक व्यवहार, डिजिटल बँकिंग सेवा आणि ग्राहकाभिमुख धोरणांमुळे बँकेवर सभासद, ग्राहक आणि ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. बँकेच्या या यशामागे संचालक मंडळाचे मार्गदर्शन, सक्षम प्रशासन आणि अधिकारी-कर्मचार्‍यांची निष्ठा व प्रामाणिकपणा हेच प्रमुख घटक असल्याचे अ‍ॅड. पांडुरंग गुंड यांनी नमूद केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply