Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या

चिठ्ठीत नाव असलेल्या तिघांविरुद्ध पाथर्डीत गुन्हा दाखल

पाथर्डी । वीरभूमी - Apr 05, 2026 • 01:17 PM 1313 views
पाथर्डी तालुक्यातील धामणगाव देवी येथील जगदंबा देवी मंदिराचे पुजारी रामदास बापुराव शिंदे (वय 55) यांनी सावकारी जाच आणि आरोपींकडून होणार्‍या मानसिक छळाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी मयताच्या खिशात सापडलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीतील (सुसाईड नोट) गंभीर आरोपांवरून पाथर्डी पोलिसांनी साकेगाव येथील दोन आणि पाथर्डी येथील एक अशा तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत रामदास शिंदे हे गेल्या 20 वर्षांपासून धामणगाव येथे पुजारी म्हणून कार्यरत होते. दि. 2 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ते घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेले होते.

रात्रभर घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता, 3 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ते स्वतःच्या शेतातील विहिरीच्या कडेला बेशुद्धावस्थेत मिळून आले. त्यांच्या तोंडाला फेस आला असल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस पंचनाम्यादरम्यान मयत रामदास शिंदे यांच्या पॅन्टच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली, ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण समोर आले आहे. चिठ्ठीत नमूद केल्यानुसार, आरोपी अनिल बाबूराव पवार याच्याकडून घेतलेल्या 30 हजार रुपयांच्या बदल्यात शिंदे यांनी आतापर्यंत 7 लाख रुपये परत केले होते. तरीही आरोपींची पैशांची हाव मिटली नव्हती.

आरोपींनी सात लाख रुपये घेऊनही शिंदे यांच्या घरातील महिलांविषयी आणि मुलीविषयी अत्यंत अश्लील व खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले. तुझ्या बायको-मुलीवर इतके वाईट बोलतात, त्यामुळे मी आज माझे जीवन संपवत आहे, असे हृदयद्रावक वास्तव शिंदे यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. माझ्यासारखा गरीब माणूस यांच्या जाळ्यात अडकू नये, असेही त्यांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी मयताची मुलगी भारती वैभव थोरात (वय 26, रा. बाराबाभळी) हिने पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अनिल बाबूराव पवार (रा. साकेगाव), महेश अनिल पवार (रा. साकेगाव) आणि अर्जुन माने (रा. पाथर्डी) या तिघांविरुद्ध वारंवार त्रास देऊन आत्महत्येस भाग पाडल्याप्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामीण भागात पसरलेल्या खासगी सावकारीच्या विळख्याने एका पुजार्‍याचा बळी घेतल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाथर्डी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply