Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

दागिने व मोबाईलसह पलायन । पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथे घटना

पाथर्डी । वीरभूमी- Apr 05, 2026 • 12:55 PM 1210 views
पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एजंटमार्फत पैसे देऊन आणलेल्या नवरीने लग्नानंतर अवघ्या काही तासांतच घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पलायन केल्याने कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुसरे येथील २४ वर्षीय तरुणाचे जालना जिल्ह्यातील एका मुलीशी एजंटच्या मध्यस्थीने लग्न ठरविण्यात आले होते. यासाठी मुलीच्या नातेवाईकांना मोठी रक्कम देण्यात आली होती.

३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी विधिवत विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास नववधू सुसरे येथील नवरदेवाच्या घरी दाखल झाली. घरात पारंपरिक शुभविधी पार पडले आणि नव्या संसाराच्या सुरुवातीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.

मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास नववधूने घरातील मोबाईल, एक तोळ्याची पोत तसेच नवरदेवाचे एक तोळ्याचे मंगळसूत्र घेऊन घराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले.

सकाळी हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेव व नातेवाईकांनी तातडीने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील विवाह व्यवस्थेतील अडचणी आणि एजंटमार्फत होणाऱ्या विवाहातील धोके पुन्हा समोर आले आहेत. सामाजिक अडचणींचा गैरफायदा घेत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, पोलिसांकडून संबंधित नववधू व एजंटचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply