Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

हरवलेल्या ‘गंगू उर्फ शोभा’ची पावशतकानंतर घरवापसी

मानसिक आजारामुळे 25 वर्षे दूर राहिलेल्या महिलेचे पुनर्वसन । श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश

भगवान गायकवाड । वीरभूमी - Apr 02, 2026 • 03:22 PM 239 views
अहिल्यानगर : मानसिक आजारामुळे घरापासून दुरावलेली अहिल्यानगर जिल्ह्यातील गंगू तब्बल 25 वर्षांनंतर आज तिच्या कुटुंबात परतली. कुटुंबीयांनी तिचे अत्यानंदाने स्वागत करत तिच्या जीवनकहाणीचा सुखांत केला.

नेपाळमधील एका संस्थेत उपचारांसाठी दाखल असलेल्या या महिलेची माहिती ‘श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’ला मिळाली. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे कार्यरत असलेली ही संस्था डॉ. स्मिता आणि डॉ. भरत वाटवानी गेली 21 वर्षे चालवत आहेत. आजवर 15 हजारांहून अधिक रुग्णांचे त्यांनी कौटुंबिक पुनर्वसन केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना 2018 मध्ये ‘रॅमन मॅगसेसे’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

श्रद्धा फाउंडेशनला नेपाळमधील गंगू या महिलेची माहिती मिळाल्यानंतर तिला भारतात आणून त्यांच्या प्रकल्पात दाखल करण्यात आले. तिच्यावर मानसिक उपचार सुरू करण्यात आले. समुपदेशनादरम्यान तिने आपले नाव ‘गंगू’ आणि गाव ‘पथरवाले, जिल्हा नगर’ असे सांगितले.

या माहितीच्या आधारे फाउंडेशनच्या टीमने तिच्या कुटुंबाचा शोध सुरू केला. गावात पोहोचल्यावर बदललेल्या परिस्थितीमुळे गंगूला काहीच ओळखू आले नाही. रस्ते, शाळा, दुकाने सर्व काही अनोळखी वाटत होते. वस्तीवर चौकशी करूनही कोणी तिला ओळखले नाही. निराश होऊन टीम परत जाण्याच्या तयारीत असताना चौकात लग्नाची वरात आडवी आली.

त्या गर्दीत एका वृद्ध व्यक्तीने ‘सुधाकर शंकर पवार’ हे नाव परिचित असल्याचे सांगितले. त्यांच्या स्मृती जाग्या झाल्या आणि त्यांनी गंगूकडे बारकाईने पाहिले. गंगूचे पती सुधाकर यांना तात्काळ शोधून त्यांची भेट घडवण्यात आली. सुरुवातीला त्यांनी तिला ओळखले नाही. माझ्या पत्नीचे नाव शोभा होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, 25 वर्षांपूर्वी हरवलेली शोभा हीच गंगू असल्याची खात्री त्यांना नंतर पटली.

गंगूने लाजून नमस्कार केल्यावर सर्व ओळखी स्पष्ट झाल्या. गंगू घर सोडून गेली तेव्हा तिचा धाकटा मुलगा केवळ दोन वर्षांचा होता; आज तो तरुण झाला आहे. आईला पाहताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. हीच माझी आई आहे, ही माझ्या आजीसारखी दिसते, असे म्हणत त्याने तिला मिठी मारली. सुरुवातीला साशंक असलेला मोठा मुलगाही नंतर भावूक झाला. सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.

गंगू धाकट्या मुलाच्या घरी गेली. 25 वर्षांनंतर गावात परतलेल्या ‘गंगू उर्फ शोभा’ला पाहण्यासाठी अख्खा गाव लोटला. अनेकांनी तिला ओळखले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.

श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या कार्यकर्त्या अनामिका अंबोरे आणि चंदना पाल यांनी गंगूला गावात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळली आणि एका विखुरलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणले.

स्नेहालय संस्थेचा ‘मानसग्राम’ हा मानसिक आरोग्यावर आधारित बहुउद्देशीय प्रकल्प आहे. डॉ. वाटवानी यांच्या श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनच्या सहकार्याने स्नेहालय, अहिल्यानगर जिल्ह्यात रस्त्यावरच्या मनोरुग्णांसाठी ‘स्नेहश्रद्धा पुनर्वसन प्रकल्प’ राबवत आहे. रस्त्यावर आढळलेल्या बेवारस रुग्णांना तात्काळ उपचार आणि कौटुंबिक पुनर्वसन मिळवून देण्यासाठी 9011011006 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply