Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रात दबदबा । सलग दुसर्‍या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुरस्कार

पाथर्डी । वीरभूमी- Apr 27, 2026 • 01:36 PM 367 views
क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरी आणि शिस्तबद्ध आयोजनाच्या जोरावर पाथर्डी येथील पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या बाबुजी आव्हाड महाविद्यालयाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर विभागातर्फे दिला जाणारा शैक्षणिक वर्ष 2025-26 चा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार या महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, सलग दुसर्‍या वर्षी हा बहुमान मिळवून महाविद्यालयाने जिल्ह्याच्या क्रीडा नकाशावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

मिरजगाव येथील नूतन महाविद्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके, माजी संचालक डॉ. दिपक माने, जिल्हा क्रीडा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. तानाजी जाधव, सचिव डॉ. राजेंद्र देवकाते उपस्थित होते.

पुरस्काराचा स्वीकार करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय देशमुख यांच्यासह प्रा. डॉ. अरुण राख, प्रा. डॉ. अशोक डोळस, प्रा. डॉ. अजयकुमार पालवे व प्रा. डॉ. आनंद घोंगडे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी या यशाचे श्रेय खेळाडूंच्या मेहनतीला व उत्कृष्ट मार्गदर्शनाला दिले आहे.

बाबुजी आव्हाड महाविद्यालयाने या शैक्षणिक वर्षात आंतर महाविद्यालयीन, आंतर विभागीय, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा व ’खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ मध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची लयलूट केली आहे. आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टिंग (मुले/मुली) संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. आर्चरी (मुली) संघाने विजेतेपद मिळवले. तर मुलांच्या क्रॉसकंट्री संघाने सांघिक उपविजेतेपद पटकावले. महाविद्यालयाच्या एकूण 7 खेळाडूंनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग व क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 30 खेळाडूंची आंतर विभागीय स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्हा संघात निवड झाली.

महाविद्यालयाने केवळ खेळाडू घडवण्यातच नव्हे, तर स्पर्धा आयोजनातही मोलाची भूमिका बजावली आहे. या वर्षात महाविद्यालयाने आंतर महाविद्यालयीन स्तरावर वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि शरीरसौष्ठव या स्पर्धांचे अत्यंत शिस्तबद्ध आयोजन केले. तसेच ‘अहिल्यानगर जिल्हा अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स वेटलिफ्टिंग लीग’ आणि ‘अहिल्यानगर जिल्हा युथ, ज्युनियर व सिनियर वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा’ यशस्वीपणे पार पाडली.

यापूर्वी देखील महाविद्यालयास ’उत्कृष्ट स्पर्धा आयोजन’ हा पुरस्कार मिळाला असून, महाविद्यालयाच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ तसेच जिल्हा पुरस्कार ’गुणवंत खेळाडू’ व ‘गुणवंत मार्गदर्शक’ असे पुरस्कार प्राप्त केले आहेत.

महाविद्यालयाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेशराव आव्हाड तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply