Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

मुख्य रस्ते व बाजारपेठ परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न

अकोले । वीरभूमी Apr 30, 2026 • 04:46 PM 157 views
अकोले नगरपंचायतीच्या वतीने शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आज धडक कारवाई करण्यात आली. ही मोहीम मुख्याधिकारी श्रीमती धनश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे राबविण्यात आली.

शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच इतर मार्गांवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली दुकाने, फेरीवाल्यांचे स्टॉल, फळ विक्रेते, बांधकाम साहित्य व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोकळा व सुरक्षित रस्ता उपलब्ध होणार आहे.

यापूर्वी संबंधितांना नोटीस देऊन व दवंडी करून अतिक्रमणे स्वखुशीने काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच नगरपंचायतीकडून बाजारतळ व गुजरी मार्केट या निर्धारित ठिकाणीच फेरीवाले व फळ विक्रेत्यांनी व्यवसाय करावा, असे सूचित करण्यात आले होते. तरीही अतिक्रमणे न काढल्यामुळे प्रशासनास ही कारवाई करावी लागली.

कारवाईदरम्यान काही साहित्य जप्त करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अकोले नगरपंचायतीकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करू नये व शहर स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. भविष्यातही अशा प्रकारच्या धडक मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे नगरपंचायतीने नेमून दिलेल्या ठिकाणीच आपला व्यवसाय करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply