संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन
‘मानवता हाच धर्म’; कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिंदा येथे कीर्तन सेवेत संतविचारांचा जागर
“मानवता हाच धर्म आहे. जो दुसऱ्या व्यक्तीचे दुःख जाणून घेत नाही, त्याची खरी प्रगती होत नाही. त्यामुळे संतांचे विचार केवळ ऐकण्यापेक्षा ते आचरणात आणणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन ह. भ. प. प्रा. डॉ. राजकुमार घुले यांनी केले.
ॐ राम कृष्ण हरी मंत्र मंदिर, श्री क्षेत्र महिंदा येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संतांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट करत उपस्थितांना मानवता, परोपकार, समाधान आणि प्राणीमात्रांवर दया करण्याचा संदेश दिला. “मनुष्य देह पुन्हा पुन्हा मिळणारी गोष्ट नाही. त्यामुळे मिळालेल्या या जन्माचे सार्थक केले पाहिजे. लोभीपणाने वागू नका. अति इच्छेमुळेच अनेक दुःखांची उत्पत्ती होते. त्यामुळे समाधानाने जगायला शिका,” असे आवाहन डॉ. घुले यांनी केले.
परोपकार केल्याने पुण्य लाभते, तर परपीडन केल्याने पाप लागते. त्यामुळे प्रत्येकाने परोपकाराची भावना मनात ठेवावी, असा संदेश त्यांनी दिला. तसेच नेहमी मुखी ‘राम कृष्ण हरी’ नामस्मरण केल्याने मन आणि देह पवित्र होतो, असेही त्यांनी सांगितले.
“सर्व प्राणीमात्रांवर दया करा,” या संतांच्या विचाराची आजच्या समाजाला अधिक गरज असल्याचे सांगताना डॉ. घुले यांनी सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपक्ष्यांसाठी पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले.
यावेळी संस्थानचे संस्थापक ह. भ. प. प्रा. डॉ. सुभाष शेकडे, सौ. गीताताई शेकडे, ह. भ. प. शिवाजी वारे, प्रा. डॉ. सुमित्रा घुले, बाळासाहेब फुंदे, राजेंद्र बडे, बबनराव टिळेकर, पांडुरंग गोसावी, दिलीप खेडकर, रमेश कांबळे, गोरक्ष दहिफळे, मारुती दहिफळे, प्रल्हाद मगर आदी उपस्थित होते.
महिंदा व विठ्ठलवाडी परिसरातील ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. निवृत्ती दहिफळे यांनी उपस्थित भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली.