Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात

प्रारूप प्रभागरचना जाहीर । हरकतींसाठी 13 एप्रिलपर्यंत मुदत

पाथर्डी । वीरभूमी- Apr 09, 2026 • 11:55 AM 1248 views
पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप प्रभागरचना सोमवारी (दि. 6 एप्रिल 2026) जाहीर करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डावर हा आराखडा प्रदर्शित करण्यात आला असून, त्यावर हरकती नोंदवण्यासाठी 13 एप्रिल 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी ग्रामविकास विभागाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. प्रारूप प्रभागरचनेत प्रत्येक गावाची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, वस्ती विभागणी तसेच निवडणूक नियमांचा विचार करून प्रभागांची सीमा निश्चित करण्यात आली आहे.

या प्रक्रियेत तिनखडी, मालेवाडी, मुंगूसवाडे, कौडगाव, पिंपळगाव टप्पा, पिंपळगव्हाण, सोमठाणे नलावडे, सोमठाणे खुर्द, शिरापूर, येळी, वाळुंज, सुसरे, शिरसाठवाडी, शिराळ, शिंगवे केशव, शेकटे, सातवड, राघोहिवरे, पिरेवाडी, पर्त्याचा तांडा, पारेवाडी, पागोरी पिंपळगाव, निपाणी जळगाव, नांदूर निंबादैत्य, मोहोज खुर्द, मोहोजदेवढे, मोहोज बु., मोहटे, माणिकदौंडी, मढी, लोहसर, लांडकवाडी, कोपरे, खेर्डे, खरवंडी कासार, खांडगाव, करोडी, कारेगाव, कामत शिंगवे, कळसपिंप्री, कडगाव, जोगेवाडी, जवळवाडी, जवखेडे दुमाला, जाटदेवळे, जांभळी, हनुमान टाकळी, घाटशिरस, घुमटवाडी, धनगरवाडी, धामणगाव, ढाकणवाडी, देवराई, भुतेटाकळी, औरंगपूर, अकोला, चिंचपूर पांगूळ, चितळवाडी, भिलवडे, बोरसेवाडी, आल्हणवाडी, आडगाव, आगसखांड, एकनाथवाडी, तोंडोळी, रांजणी, मिडसांगवी, मिरी, माळीबाभुळगाव, मांडवे, भारजवाडी, कासार पिंपळगाव, चिंचपूर इजदे, चितळी, भोसे, सांगवी बु., केळवंडी, दुलेचांदगाव आणि कोकीसपीर तांडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

संबंधित ग्रामपंचायत स्तरावर प्रारूप प्रभाग रचना आराखडा उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामस्थ, राजकीय कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी हा आराखडा तपासून पाहावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रभाग रचनेत काही त्रुटी किंवा हरकती असल्यास त्या 13 एप्रिल 2026 पर्यंत लेखी स्वरूपात संबंधित तहसील कार्यालयात सादर करता येणार आहेत. प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply