Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

घरात एकटी असताना अल्पवयीन मुलीचे अपहरण

आजोबांना फोन करून मुलीची मदतीची याचना । आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पाथर्डी । वीरभूमी - Apr 02, 2026 • 09:39 AM 403 views
तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात एका तरुणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीचा व आरोपीचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे आई-वडील 30 मार्च रोजी शेतात गेले होते. मुलगी घरात एकटीच होती. सायंकाळी ते घरी परतल्यावर मुलगी घरात नसल्याचे आढळले. परिसरात चौकशी केली असता, तेजस जयकुमार देशमुख (रा. कासार पिंपळगाव, ता. पाथर्डी) याने तिला पळवून नेल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, मुलीने तिच्या आजोबांच्या फोनवरून संपर्क साधत, मला दमदाटी करून पळवून आणले असून मला घरी यायचे आहे, अशी माहिती दिली. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी आरोपीने मुलीच्या पालकांशी संपर्क साधला होता. त्यावेळी पालकांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगून त्याला दूर राहण्याचा इशारा दिला होता. तरीदेखील आरोपीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

तालुक्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून मुलीचा शोध लावावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply