Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगावात महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध

हर्षु ठाकूर व आयोजकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय मागणी

शेवगाव । वीरभूमी- Mar 30, 2026 • 03:11 PM 686 views
शेवगाव येथे रामनवमी निमित्त आयोजित सभेत हर्षु ठाकूर या महिलेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह व निंदाजनक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभेदरम्यान हरामखोर गांधी अशा शब्दांचा वापर केल्याचे सांगितले जात असून, हे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटली आहे.

तसेच, संबंधित महिलेने मुस्लिम व ख्रिश्चन समाजाबद्दलही द्वेषपूर्ण व शिवराळ भाषेत वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा देत सर्वपक्षीय नागरिक, संघटना व शांतताप्रेमी लोकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर, संबंधित महिलेविरुद्ध तसेच तिचा सत्कार करणार्‍या आमदार व कार्यक्रम आयोजकांविरोधात तात्काळ दखलपात्र गुन्हा, तसेच राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आज शेवगाव येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर सर्वपक्षीय उपोषण व आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महात्मा गांधी यांच्या योगदानाची आठवण करून देत, धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी असा आरोप केला की, काही कार्यक्रमांना पोलीस व प्रशासनाची संमती असल्याने अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळत असून, यामुळे समाजात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख अ‍ॅड. अविनाश मगरे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष समीर काझी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉ. संदीप इथापे, शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, माजी सरपंच एजाज काझी, धनंजय डहाळे, कॉ. बापूराव राशिनकर, दत्तात्रय आरे, समद काझी, सुरेश मगर आदी उपस्थित होते. शेवगावचे पोनि. संतोष मुटकुळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply