Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

या गावात मास्क न वापरणार्‍या 27 जणांवर दंडात्मक कारवाई

या गावात मास्क न वापरणार्‍या 27 जणांवर दंडात्मक कारवाई

पाथर्डी । वीरभूमी- Mar 27, 2021 • 12:00 AM 2096 views
पाथर्डी पंचायत समितीच्या पथकाने तालुक्यातील मिरी येथे कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये 27 जणांकडून दंड वसूल करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमाबाबत जनजागृती केली.

पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी नुकतेच आदेश काढून गावामध्ये विनामास्क फिरणार्‍या व्यक्ती, कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन न करणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसा याबाबत त्यांनी आदेशही काढला आहे.

या आदेशाने आज शनिवारी पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांच्यासह ग्रामसेवक रवी देशमुख, राजेंद्र साखरे, प्रमोद मस्के, ग्रामपंचायत कर्मचारी जयदीप गवळी, संभाजी घोरपडे यांच्या पथकाने केली.

या कारवाईमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणार्‍या सुमारे 27 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या सर्वांकडून दंड वसूल करून यापुढे कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करण्याबाबत सांगितले. तसेच पथकाने मिरी ग्रामस्थांना नियमित मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करणे, विनाकारण घरा बाहेर पडू नये, सॅनिटायझरचा वापर करावा, हात वारंवार धुवावेत याबाबत जनजागृती करण्यात आली.

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन विस्ताराधिकारी प्रशांत तोरवणे यांनी केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply