Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

नगर जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढली

नगर जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढली

अहमदनगर । वीरभूमी - Mar 28, 2021 • 12:00 AM 2364 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत काल शनिवारी घट झाल्यानंतर पुन्हा आज रविवारी वाढ होऊन एकूण रुग्ण संख्येत 1228 कोरोना बाधितांची भर पडली होती.

रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा हा 1228 एवढा आहे. कोरोना बाधितांचा आकडा कालच्या पेक्षा अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना बाधितांच्या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. नगर शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वाधिक रुग्ण संख्या नगर शहरात 354 आढळली असून त्याखालोल राहाता 126, कोपरगाव 89, संगमनेर 84, राहुरी 82, श्रीरामपूर 79, कर्जत 59, नेवासा 52, जामखेड 47, अकोले 39, पाथर्डी 39, नगर ग्रामीण 37, पारनेर 35, श्रीगोंदा 33, कन्टेन्मेंट बोर्ड 29, शेवगाव 22 व इतर जिल्हा 22 असे रुग्ण आढळले.

आज रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 257, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 599 आणि अँटीजेन चाचणीत 372 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 102, राहाता 38, कोपरगाव 37, राहुरी 02, श्रीरामपूर 02, कर्जत 13, नेवासा 12, अकोले 03, पाथर्डी 01, नगर ग्रामीण 08, पारनेर 04, श्रीगोंदा 13, कन्टेंमेंट बोर्ड 22 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 221, राहाता 74, कोपरगाव 52, संगमनेर 67, राहुरी 18, श्रीरामपूर 54, कर्जत 04, नेवासा 12, जामखेड 02, अकोले 12, पाथर्डी 05, नगर ग्रामीण 23, पारनेर 14, श्रीगोंदा 10, कन्टेंमेंट बोर्ड 07, इतर जिल्हा 18, शेवगाव 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 372 जण बाधित आढळुन आले. मनपा मनपा 31, राहाता 14, संगमनेर 17, राहुरी 62, श्रीरामपूर 23, कर्जत 42, नेवासा 28, जामखेड 24, अकोले 24, पाथर्डी 33, नगर ग्रामीण 06, पारनेर 17, श्रीगोंदा 10, इतर जिल्हा 04, शेवगाव 16 अशा रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर जातांना तोंडाला मास्क लावावा, नियमित सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे तसेच लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply