Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेततळ्यात बुडून बाप-लेकीचा मृत्यू

शेततळ्यात बुडून बाप-लेकीचा मृत्यू

अकोले । वीरभूमी- Mar 29, 2021 • 12:00 AM 4079 views
अकोले तालुक्यातील वीरगावच्या सुपारमाळ शिवारात सोमवारी दुपारी 1.30 वाजेच्या दरम्यान घराशेजारील शेततळ्यात बुडून वडील आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या दुर्घटनेत कृष्णकांत जगन्नाथ थोरात (वय 43 वर्षे) आणि त्यांची दहावीत शिकत असलेली मुलगी आश्विनी कृष्णकांत थोरात (वय 16 वर्षे) या दोघांचे निधन झाले.

सोमवारी दुपारी 1.30 वा. आश्विनी राहते घराशेजारील शेततळ्याजवळून जात असताना पाय घसरुन पडली. तिचा आरडाओरडा ऐकून घरातील व्यक्ती पळतच शेततळ्याजवळ गेल्या. मुलीला वाचविण्यासाठी कृष्णकांत थोरात यांनी शेततळ्यात उडी घेतली.

शेततळे पुर्ण भरलेले असल्याने व त्यातील कागद आणि शेवाळामुळे दोघांनाही कडेला येता आले नाही. यामुळे दोघांचाही शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या दरम्यान शिवारातून आणि गावातूनही लोक जमा झाले होते. दीपक दातीर, करीम इनामदार यांनी शेततळ्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी त्यांचे कुटुंबियांचा आकांत हृदयद्रावक होता.

मयत कृष्णकांत थोरात यांचे पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, मामा-मामी असा परिवार आहे. अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकूल वातावरणात दोघांवर वीरगाव येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अकोले पोलिस स्टेशनला या घटनेची आकस्मात रजिस्टरला नोंद करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply