Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

हिंदू व्यापार्‍याकडून पवित्र 786 शुभांक असलेल्या नोटांचा संग्रह मशिदीला दान

हिंदू व्यापार्‍याकडून पवित्र 786 शुभांक असलेल्या नोटांचा संग्रह मशिदीला दान

श्रीगोंदा । विजय उंडे - Apr 03, 2021 • 12:00 AM 1470 views
मुस्लिम धर्मीयांत पवित्र शुभांक असलेल्या 786 क्रमांकाच्या नोटा जमा करण्याचा छंद श्रीगोंदा येथील व्यावसायिकास जडला होता.

संकलित झालेल्या नोटा मशिदीच्या जिर्णोद्धारासाठी दान करण्याचा निर्णय येथील एका हिंदू व्यापारी भाविकाने घेतला.धार्मिक औदार्य जपण्याच्या व हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या या कृतीचे मुस्लिम समाजातून स्वागत होत आहे.

आपले नाव प्रसिद्ध करू नये अशी या व्यावसायीकाची इच्छा आहे. नावाप्रमाणेच मधुर असलेले व्यापारी कृषी बियाणे, औषधे व किटकनाशकासह प्रगतशील शेतकरी व उद्योजक म्हणून त्यांचा तालुकाभर लौकिक आहे. नोटेवर 786 हा क्रमांक दिसला की, ती नोट ते जतन करून ठेवीत. अनेक वर्षांच्या या छंदातून त्यांनी खूप सार्‍या नोटा संकलित केल्या.साचविलेल्या या नोटांचे पुढे काय करायचे हा प्रश्न उभा राहिला. समजपयोगी कामासाठी ही रक्कम खर्ची करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

श्रीगोंदा येथील माजी उपनगराध्यक्ष अख्तरभाई शेख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मग ही रक्कम येथील जामा मशिदीच्या जीर्णोद्धार कार्यासाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पत्रकार आरिफभाई शेख, डॉ. राज सय्यद, डॉ. इम्रान जमादार, हाजी अस्लम बेपारी आणि अख्तरभाई शेख यांच्या हस्ते ही रक्कम मशिदीच्या विश्वस्तांकडे सोपविण्यात आली.

सदर व्यक्तीने आपल्या आचरणातून धार्मिक सौहार्द व समरसतेचा संदेश व आदर्श दाखविला असून मुस्लिम समाज त्यांचा ऋणी असल्याची भावना यावेळी श्री.शेख यांनी व्यक्त केली. मशिदीच्या कामासाठी आणखी काही निधी लागला तरी आपण तो देऊ, अशी भावना या व्यवसायिकाने व्यक्त केली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply