Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

महावितरणने रस्त्यालगत झाडांचे शेंडे छाटले

फांद्या तोडल्याने असंख्य झाडांची उंची खुंटणार । पर्यावण प्रेमींकडून नाराजी

सुपा । वीरभूमी- Apr 07, 2021 • 12:00 AM 1272 views
वीज वाहक तारांना अडथळा निर्माण करणार्‍या अहमदनगर - पुणे महामार्गालगत असलेल्या झाडांचे शेंडे महावितरणच्या कर्मचार्‍यांनी छाटले.

ही घटना बुधवारी सुप्यानजिक पवारवाडी जवळ घडली. एकीकडे झाडे लावा- झाडे जगवाचा संदेश दिला जात असतांना दुसरीकडे सर्रास झाडांचे शेंडे तोडून नुकसान केले जात असल्याने पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत असे की, अहमदनगर-पुणे महामार्गावरील झाडे सुपा (पवारवाडी) रोड दरम्यान दौलत पेट्रोल पंप ते हरिदास पेट्रोल पंपादरम्यान असलेल्या वीजवाहक तारांच्या जवळ आली आहेत. वीजपुरवठा खंडीत होवू नये म्हणून महावितरणच्या कर्मचार्‍यांनी असंख्य झाडाचे शेंडे तोडून नासधूस केली.

अहमदनगर ते शिरुर महामार्गाच्या रुंदीकरणाच्या दरम्यान असंख्य वडाची झाडे काढावी लागली होती. त्या बदल्यात रस्ता विकासकाने तेथे नव्याने झाडे लावली.

त्यानंतर त्याच झाडांच्या बरोबर वरतून महावितरणने वीज वाहक तारा ओढल्या. कालांतराने ही झाडे मोठी झाली व ती ताराच्या जवळ आली. भविष्यात काही धोका होऊ नये म्हणून बुधवारी महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी असंख्य झाडांची शेंडे तोडून नासधूस केली.

दहा ते पंधरा फुट उंचीचे झाड होण्यासाठी कमीतकमी दहा ते बारा वर्षाचा कालावधी लागतो. आशावेळी महावितरण कंपनीच्या ठेकेदारांनी मागचा पुढचा विचार न करता सरळ दिसेल तिथे विजेचे खांब रोवून झाडांवरून वीजवाहक तारा नेल्या. कालांतराने झाडे मोठाली झाल्याने या झाडांच्या फांद्या वीजवाहक तारांमध्ये शिरू लागल्या.

भविष्यात होणारा धोका विचारात घेऊन महावितरणच्या कर्मचार्‍यांनी भविष्याचा विचार न करता महामार्गालगत असलेल्या झाडांची शेंडे छाटून टाकली. या प्रकारामुळे भविष्यात या झाडांची उंची खुंटणार आहे. महावितरणच्या या कारभारामुळे पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply