Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोनाचे आज पुन्हा नव्याने रेकॉर्ड

गुरुवारी जिल्ह्यात आढळले 2233 : कर्जत 201, पाथर्डी 114, शेवगाव 103, अकोले 128

अहमदनगर । वीरभूमी - Apr 08, 2021 • 12:00 AM 3133 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसाआड नवे रेकॉर्ड करत आहे. काल कोरोना बाधितांचा आकडा घटलेला असतांना आज पुन्हा नव्याने रेकॉर्ड करत आज गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तब्बल 2233 कोरोना बाधित आढळले आहेत.

शासनाच्यावतीने दोन दिवसापासून मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र लॉकडाऊनच्या दुसर्‍या दिवशी आकडेवारी कमी आली होती. आज तिसर्‍या दिवशी पुन्हा बाधितांचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे पालन केले तर कोरोनाला आपण हरवू शकू.

वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून आज नगर शहरातील आकडेवारी आज 611 असून दुसर्‍या क्रमांकावर कर्जतने 201 चा आकडा गाठत दुसरा क्रमांक राखला आहे. त्या खालोखाल संगमनेर 198, नगर ग्रामीण 187, अकोले 128, राहाता 117, पाथर्डी 114, राहुरी 107, शेवगाव 103, कोपरगाव 99, श्रीरामपूर 79, पारनेर 70, नेवासा 55, भिंगार कन्टेन्मेंट 54, जामखेड 47, श्रीगोंदा 40, इतर जिल्हा 17, मिलट्री हॉस्पिटल 06 या प्रमाणे कोरोना बाधित आढळून आले आहेत.

आज गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 859, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 549 आणि अँटीजेन चाचणीत 825 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 271, कर्जत 37, संगमनेर 151, नगर ग्रामीण 36, अकोले 103, राहाता 10, पाथर्डी 27, राहुरी 07, शेवगाव 26, कोपरगाव 64, पारनेर 38, नेवासा 12, भिंगार कन्टेन्मेंट 38, जामखेड 08, श्रीगोंदा 21, इतर जिल्हा 02, मिलट्री हॉस्पिटल 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 202, कर्जत 04, संगमनेर 44, नगर ग्रामीण 39, अकोले 09, राहाता 84, पाथर्डी 22, राहुरी 07, शेवगाव 26, कोपरगाव 29, श्रीरामपूर 47, पारनेर 08, नेवासा 05, भिंगार कन्टेन्मेंट 04, जामखेड 03, श्रीगोंदा 06, इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 825 जण बाधित आढळून आले. मनपा 138, कर्जत 160, संगमनेर 03, नगर ग्रामीण 112, अकोले 16, राहाता 23, पाथर्डी 63, राहुरी 93, शेवगाव 51, कोपरगाव 06, श्रीरामपूर 32, पारनेर 24, नेवासा 38, भिंगार कन्टेन्मेंट 12, जामखेड 36, श्रीगोंदा 13, इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply