Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

रविवार पर्यंत वादळी वारा अन् पाऊस

रविवार पर्यंत वादळी वारा अन् पाऊस

परभणी - Apr 08, 2021 • 12:00 AM 2873 views
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्राकडे प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता वर्तवली आहे.

तसेच मराठवाड्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यातही वादळी वार्‍यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीची कामे अपूर्ण असतील तर ती आजच पुर्ण करून घ्या, नाहीत नुकसान होण्याची शक्यता आहे.

कृषी विद्यापिठाच्या ग्रामीण हवामान सेवा केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवार दि. 9 रोजी नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे. दि. 10 रोजी हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे.

11 रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, जालना व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे.

तसेच मराठवाड्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यातही अवकाळी पाऊस होऊ शकतो. यामध्ये जामखेड, पाथर्डी, शेवगाव, नेवासा या तालुक्याचा समावेश आहे.

यामुळे शेतकर्‍यांनी काढणी व मळणी केलेले पीक ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून ठेवावे. तसेच बर्‍याच शेतकर्‍यांना ज्वारी काढणी केल्यानंतर कडबा गोळा केलेला नाही तो लवकरात लवकर गोळा करून सुरक्षित ठिकाणी साठवावा.

विजा व पाऊस सुरू असताना शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, तत्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असा सल्ला केंद्राच्या वतीने देण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply