Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

देवराई येथील बंधार्‍याने घेतला दोन तरूणांचा बळी

पाथर्डी तालुक्यातील दुदैवी घटना । परिसरातून हळहळ

करंजी । वीरभूमी- Apr 08, 2021 • 12:00 AM 8114 views
पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळील बंधार्‍यात तिसगाव व करंजी येथे जिलेबीची विक्रीसाठी गेल्या काही दिवसापासून स्थायिक असलेले तीन तरूण गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बंधार्‍यातील पाण्यात आंघोळीसाठी गेले होते.

यातील दोन तरुणांचा बंधार्‍यात बुडून मृत्यू झाला तर एक तरूण सुदैवाने बचावला.

मयत तरूणांची नावे प्रणव पांडुरंग कुचेकर (वय 17, रा. बीड) व मनेष देवराबी बिष्णोई (वय 23, रा. जोधपूर, राजस्थान) असे आहे.

याबाबतची माहिती अशी की, तिसगाव व करंजी येथे मिठाईचा व्यवसाय करण्यासाठी राजस्थान येथून काही कुटुंब येथे स्थायिक झालेले आहेत. यामधील प्रणव पांडूरंग कुचेकर (वय 17, रा. बीड), मनेष देवराबी बिष्णोई व लादुराव जगन्नाथ पालेवाल (दोघे रा. जोधपूर, राजस्थान) हे तिघे तरुण गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास देवराई (ता. पाथर्डी) येथील बंधार्‍यात आंघोळ करण्यासाठी गेले होते.

अंघोळ करण्यासाठी ते बंधार्‍यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यापैकी प्रणव व मनेष या दोघांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. तर लादूराम पालेवाल हा मात्र सुदैवाने बचावला. प्रणव व मनेष हे पाण्यात बुडत असतांना लादूराम याने राष्ट्रीय महामार्गावर उभे राहून आरडाओरड करून इतरांना मदतीसाठी बोलावले.

लादूरामच्या हाकेला ओ देत मदतीला आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रणव व मनेष या तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक फौजदार रवींद्र चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड यांनी घटनास्थळी येऊन या दोन तरुणाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला रवाना केले.

पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या या दोन तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी युवानेते अनिल पालवे, रामदास माळी, गणेश कारखेले पांडुरंग कारखेले यांनी सहकार्य केले.

मयत तरूण हे गेल्या काही दिवसांपासून तिसगाव, करंजी येथे जिलेबी विक्रीचा व्यवसाय करत होते. यामुळे त्यांचा अनेकांना परिचय होता. या घटनेने तिसगाव, करंजी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply