Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

आजही जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोन हजार पार

पाथर्डी 146, अकोले 120, संगमनेर 169, कर्जत 114

अहमदनगर । वीरभूमी - Apr 09, 2021 • 12:00 AM 2389 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आजही दोन हजार पार आहे. आज शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 2022 ने भर पडली.

शासनाच्यावतीने ती दिवसापासून मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र लॉकडाऊनच्या तिसर्‍या दिवसानंतरही कोरोना बाधितांचा आकडा हा वाढताच असून चिंता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे पालन केले तर कोरोनाला आपण हरवू शकू. वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून आज नगर शहरातील आकडेवारी आज 526 असून दुसर्‍या क्रमांकावर पुन्हा संगमनेर 169 तर पाथर्डी 146 चा आकडा गाठत तिसरा क्रमांकावर आहे.

तसेच आज आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये राहाता 137, कोपरगाव 132, अकोले 120, कर्जत 114, श्रीरामपूर 114, नगर ग्रामीण 113, राहुरी 86, जामखेड 70, श्रीगोंदा 60, भिंगार कन्टेंमेंट 57, नेवासा 54, शेवगाव 52, पारनेर 43, इतर जिल्हा 27, इतर राज्य 02 या प्रमाणे कोरोना बाधित आढळून आले आहेत.

आज शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 527, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 579 आणि अँटीजेन चाचणीत 916 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 235, संगमनेर 37, पाथर्डी 56, राहाता 02, कोपरगाव 42, अकोले 02, कर्जत 23, श्रीरामपूर 24, नगर ग्रामीण 18, राहुरी 03, जामखेड 30, श्रीगोंदा 17, भिंगार कन्टेंमेंट 30, नेवासा 03, पारनेर 01, इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 167, संगमनेर 109, पाथर्डी 02, राहाता 88, कोपरगाव 35, अकोले 42, कर्जत 03, श्रीरामपूर 36, नगर ग्रामीण 25, राहुरी 15, जामखेड 03, श्रीगोंदा 03, भिंगार कन्टेंमेंट 18, नेवासा 08, पारनेर 10, इतर जिल्हा 13, इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 916 जण बाधित आढळून आले. मनपा 124, संगमनेर 23, पाथर्डी 88, राहाता 47, कोपरगाव 55, अकोले 76, कर्जत 88, श्रीरामपूर 54, नगर ग्रामीण 70, राहुरी 68, जामखेड 37, श्रीगोंदा 40, भिंगार कन्टेंमेंट 09, नेवासा 43, शेवगाव 52, पारनेर 32, इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply