Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यात पुन्हा उच्चांक; आज आढळले 2210 कोरोना बाधित

नगर 534, शेवगाव 107, कर्जत 150, पारनेर 105

अहमदनगर । वीरभूमी - Apr 10, 2021 • 12:00 AM 3029 views
दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. आज शनिवारी पुन्हा जिल्ह्यात उच्चांक झाला असून दुपारी 3 वाजेपर्यंत 2210 कोरोना बाधित आढळले आहे.

आज जिल्ह्यात सर्वत्र कडक विकेंड लॉकडाऊन पाळला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात जनता कर्फ्यू असून रस्ते सुनसान आहेत. मात्र आजही पुन्हा कोरोना बाधितांच्या आकड्याने उच्चांक केला आहे. यामुळे ही आकडे वारी चिंता वाढवणारी ठरत आहे.

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे पालन केले तर कोरोनाला आपण हरवू शकू. वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात असून आज नगर शहरातील आकडेवारी 534 असून पारनेर, शेवगाव तालुक्यानेही शंभरचा आकडा पार केला आहे.

आज आढळलेल्या एकूण रुग्णांमध्ये मनपा 534, राहाता 183, संगमनेर 163, श्रीरामपूर 162, कर्जत 150, राहुरी 140, नगर ग्रामीण 115, अकोले 111, शेवगाव 107, पारनेर 105, कोपरगाव 87, नेवासा 87, जामखेड 81, पाथर्डी 60, श्रीगोंदा 51, भिंगार कन्टेंन्मेंट 50, मिलट्री हॉस्पिटल 14, इतर जिल्हा 10 या प्रमाणे कोरोना बाधित आढळून आले आहेत.

आज शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 950, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 484 आणि अँटीजेन चाचणीत 766 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 390, राहाता 42, संगमनेर 94, श्रीरामपूर 45, कर्जत 04, राहुरी 25, नगर ग्रामीण 44, अकोले 68, शेवगाव 24, पारनेर 53, कोपरगाव 25, नेवासा 06, जामखेड 70, श्रीगोंदा 12, भिंगार कन्टेंन्मेंट 44, मिलट्री हॉस्पिटल 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 86, राहाता 117, संगमनेर 53, श्रीरामपूर 45, कर्जत 11, राहुरी 35, नगर ग्रामीण 15, अकोले 19, शेवगाव 04, पारनेर 12, कोपरगाव 40, नेवासा 15, जामखेड 03, पाथर्डी 04, श्रीगोंदा 14, भिंगार कन्टेंन्मेंट 04, इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 766 जण बाधित आढळून आले. मनपा 58, राहाता 24, संगमनेर 16, श्रीरामपूर 72, कर्जत 135, राहुरी 80, नगर ग्रामीण 56, अकोले 24, शेवगाव 79, पारनेर 40, कोपरगाव 22, नेवासा 66, जामखेड 08, पाथर्डी 56, श्रीगोंदा 25, भिंगार कन्टेंन्मेंट 02, इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply