Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

कोरोना बाधितांना पुरणपोळी देत केला पाडवा गोड

गुढीपाडव्याचे औचित्य साधत विवेकभैय्या कोल्हे यांनी साधला कोरोनाबधित रुग्णांशी संवाद

कोपरगाव । वीरभूमी - Apr 13, 2021 • 12:00 AM 717 views
देशासह राज्यात कोरोना आजाराने धुमाकुळ घातला आहे. दिवसागणिक वाढती रूग्णासंख्येमुळे नागरीक भयभीत झालेले आहे. अनेकांच्या कुटूंबातील काही सदस्य कोविड सेंटरमध्ये तर काही विलगीकरण कक्षात आहे. या परिस्थितीचा परिणाम आजच्या नववर्षारंभदिनी गुढीपाडवा या सणावर दिसुन आला. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक श्री विवेकभैया बिपीनदादा कोल्हे यांनी आज कोपरगाव येथील कोविड सेंटरला भेट देउन गुढीपाडवा दिनानिमित्त रूग्णांना पुरणपोळीच्या जेवणाचे वाटप केले. त्यांचेशी संवाद साधत कोरोनाबाधित रूग्णांना येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या. कमी पडत असलेले औषधे, सिलेंडर आणि आॅक्सीजन मशीनची गरज लक्षात घेउन तातडीने कोविड सेंटरला सिलेंडरसह आॅक्सीजन मशीन व औषधे उपलब्ध करून दिले.

यावेळी श्री कोल्हे म्हणाले, आज देशात संकटजन्य परिस्थिती निर्माण झाली असुन महाराष्ट्रात रूग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. कोपरगाव तालुक्यातही रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे या संकटाला आपल्यासर्वांना एकजुटीने सामोरे जायचे आहे. आपण सर्व एका कुटूंबातील असुन घाबरून न जाता या संकटाचा मुकाबला करायचा आहे. रूग्णांना समस्यांची विचारपूस करत, आपण सर्वजण मिळून यातून लवकरच बाहेर पडू, असा धीर दिला.

ज्या ज्या वेळी तालुक्यावर संकटाची परिस्थिती निर्माण झाली त्या त्या वेळी संजीवनी उदयोग समूह नेहमीच मदतीला धावून येत असतो. अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे साहेब यांनी कोरोना महामारीच्या सुरूवातीपासून नागरीकांच्या सुरक्षितेसाठी विविध उपक्रम राबविले आहे. कोरोना आजारापासून बचाव होण्यासाठी नागरीकांना मास्क,सॅनिटायझर आदीसह सुरक्षिततेच्या साहित्याचा पुरवठा करत नागरीकांना लसीकरणासाठी मोलाची मदत करीत आहे. गेल्या वर्षभरापासून या प्रसंगाला सामोरे जात असतांना येणा-या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, महसूलमंत्री, ग्रामविकास तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसिलदार तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

रूग्णांना तुटवडा जाणवत असलेल्या औषधांचा तातडीने पुरवठा करण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार राजेंद्र शिंगणे यांचेशी संपर्क करून औषधे उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली असल्याचे श्री विवेक कोल्हे यांनी सांगितले.

यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, शिवाजी खांडेकर, जनार्धन कदम, रविंद्र रोहमारे, सागर जाधव, प्रमोद नरोडे, दिपक जपे, वैभव गिरमे, जगदीश मोरे, शुभम काळे उपस्थित होते. यावेळी कोविड सेंटरला काम करत असलेल्या वैदयकिय अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद साधत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नागरीकांना सुविधा देत असल्याबददल त्यांचे अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply