Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्ह्यातील उपलब्ध बेडची माहिती आता एका फोन कॉलवर

जिल्हा प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष कार्यान्वित

अहमदनगर । वीरभूमी- Apr 14, 2021 • 12:00 AM 2644 views
जिल्ह्यातील अनेक रुग्णांना बेड मिळेल का नाही, याची चिंता लागून राहीली आहे.

बेड न मिळण्याच्या भितीने उपचारही घेतले जात नाहीत. मात्र जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी 24x7 नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना खाजगी व शासकीय रुग्णांलयातील बेडची माहिती एका फोन कॉलवर मिळणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या निर्देशानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 0241-2345460 असा आहे. या कंट्रोल रुमसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रीमती उर्मिला पाटील यांची तर सहाय्यक अधिकारी म्हणून जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली आहे.

नागरीकांनी जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती मिळणेकरीता सदर नियंत्रण कक्षाशी (कंट्रोल रुमशी) संपर्क साधावा. सदर कंट्रोल रुम 24x7 सुरु राहील, असे कळविण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply