Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लॉकडाऊन काळात दुकान उघडणे पडले महागात

पाथर्डीत दुकानदाराला दहा हजाराचा दंड

पाथर्डी । वीरभूमी - Apr 18, 2021 • 12:00 AM 1197 views
लॉकडाऊन काळात दुकान उघडून ग्राहकास माल देणे, दुकानदाराला चांगलेचं महागात पडले आहे. संबंधित दुकानदाराला नगर परिषदच्या पथकाने ग्राहकाला माल देतांना रंगेहाथ पकडून दहा हजाराचा दंड ठोकल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान नियम मोडणार्‍यांच्या विरोधात पाथर्डी नगर परिषदेने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन करणार्‍या पाथर्डी शहरातील 15 दुकानदारांकडून प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे 15 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शेवगाव रोडवरील, बस स्थानकाच्या समोरील जयभवानी स्टील ट्रेडर्स या दुकानदाराला नगर परिषदच्या पथकाने, ग्राहकाला दुकानातील माल देतांना रंगेहाथ पकडले असता त्याच्यावर दंडात्मक कारवाई करुन 10 हजाराचा दंड वसूल केला.

तर शहरात विना मास्क फिरणार्‍या 150 जणांकडून प्रत्येकी शंभर रुपये प्रमाणे दंड आकारात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख गौरव आदिक, कर व प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण हाडके, ज्ञानूसिंग परदेशी, रविंद्र बर्डे, नंदलाल गोला, रशिद शेख, अनिल दिनकर, अनिल कोळसे, जावेद शेख यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नगर परिषदेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने नियम मोडणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply