Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

चंदन चोरट्यांना शेतकर्‍यांनी सॅनिटायझर लावून धू-धू धुतले

चंदनाच्या झाडाची चोरी करताना तस्करांना शेतकर्‍यांनी रंगेहाथ पकडून केले पोलिसांच्या हवाली

श्रीगोंदा । वीरभूमी- Apr 19, 2021 • 12:00 AM 2776 views
श्रीगोंदा शहराजवळील भोळेवस्ती रस्त्यावर सोमवार दि. 19 रोजी भरदुपारी बारा वाजता दोन चंदन चोरटे चंदनाचे झाड चोरी करण्याच्या उद्देशाने कापत असताना आसपासच्या शेतकर्‍यांनी रंगेहाथ पकडले.

शेतकर्‍यांनी चोरट्यांना चांगलाच प्रसाद देऊन पोलिसांच्या हवाली केले. आरोपींकडून एक लोखंडी पोगर व मोटारसायकल ताब्यात घेतली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी संतोष रामभाऊ कोथिंबीरे (वय 31) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, भोळेवस्ती रस्त्यावरील गट नं. 1,735 येथील आमच्या चुलत भावाच्या शेताच्या बांधावरील दोन चंदनाची झाडे भरदिवसा दुपारी बारा वाजेच्या सुमारास आरोपी भीमा हनुमंत भोसले (वय वर्षे-35) व सुनिल हनुमंत भोसले (वय वर्षे-26) (दोघे रा. शिरूर, जि. पुणे) हे चोरीच्या उद्देशाने झाडे कापत असताना मिळून आले.

या चोरांना पकडून पोलिसांना खबर दिली. तात्काळ पोलीस हवालदार बी. एल. खारतोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या आरोपींना पकडून आणले. त्यांच्याकडून झाड कापण्याची लोखंडी पोगर व 20 हजार रुपयांची मोटारसायकल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराम ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बी. एल. खारतोडे करत आहेत.

हे चोरटे चंदनाची दिवसाच चोरी करताना सापडल्यावर आसपासच्या शेतकर्‍यांनी या चंदन चोरट्यांना खरपूस रट्टे द्यायला सुरुवात केली.

मार खाताना यातील एक चोरटा विनवणी करून म्हणाला की, आम्हाला मार द्या! पण हाताला सॅनिटायझर लावून काय मारायची ते मारा! चोरट्यांच्या विनंतीला मान देऊन शेतकर्‍यांनीही हाताला सॅनिटायझर लावून चोरांना चांगलेच बदडले व पोलिसांच्या हवाली केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply