Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा स्थिर

आज आढळले 3176 कोरोना बाधित

अहमदनगर । वीरभूमी - Apr 22, 2021 • 12:00 AM 1863 views
अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध लावले असतांनाही बेजबाबदारपणामुळे कोरोना बाधितांचा आकडा स्थिर झाला आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात 3176 कोरोना बाधित आढळले आहेत. जामखेड व पारनेर तालुके वगळता इतर तालुक्यातील आकडेवारी शंभरीपार आहेत.

दिवसेंदिवस नगर जिल्ह्यातील परिस्थित कठीण बनत चालली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नाहीत, रेमडिसीवीर औषध मिळत नाहीत. तर काही भागात बेड मिळत नसल्याचे चित्र आहे.

यावर उपाय म्हणुन नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन केले तर कोरोना संसर्ग आपण रोखू शकू. मात्र अनेकजन नियमाचे पालन करत नसून बेजबाबदारपणे वागत आहेत.

मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा बेजबाबदार नागरिकांमुळे वाढताच आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात 3176 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 528, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1434 तर अँटीजेन चाचणीत 1214 असे 3176 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 615 वर गेला असून कर्जत 336, राहाता 302, संगमनेर 226, नगर ग्रामीण 223, अकोले 197, कोपरगाव 178, श्रीरामपूर 174, राहुरी 158, पाथर्डी 141, नेवासा 138, शेवगाव 138, श्रीगोंदा 128, इतर जिल्हा 70, जामखेड 66, पारनेर 45, भिंगार कन्टेंमेंट 26, मिलटरी हॉस्पिटल 13, इतर राज्य 02 असे रुग्ण आढळले आहेत.

यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 73, कर्जत 153, राहाता 44, नगर ग्रामीण 04, अकोले 81, कोपरगाव 29, श्रीरामपूर 02, राहुरी 02, पाथर्डी 47, नेवासा 22, शेवगाव 19, श्रीगोंदा 11, इतर जिल्हा 02, जामखेड 21, पारनेर 01, भिंगार कन्टेंमेंट 04, मिलटरी हॉस्पिटल 13 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 462, कर्जत 13, राहाता 180, संगमनेर 199, नगर ग्रामीण 108, अकोले 54, कोपरगाव 78, श्रीरामपूर 73, राहुरी 52, पाथर्डी 46, नेवासा 33, शेवगाव 23, श्रीगोंदा 05, इतर जिल्हा 62, जामखेड 04, पारनेर 22, भिंगार कन्टेंमेंट 18, इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 1214 जण बाधित आढळून आले. मनपा 80, कर्जत 170, राहाता 78, संगमनेर 27, नगर ग्रामीण 111, अकोले 62, कोपरगाव 71, श्रीरामपूर 99, राहुरी 104, पाथर्डी 48, नेवासा 83, शेवगाव 96, श्रीगोंदा 112, इतर जिल्हा 06, जामखेड 41, पारनेर 22, भिंगार कन्टेंमेंट 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply