Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिला अग्निडाग

मढेवडगावच्या स्मशानभूमीत रयतक्रांतीचे अनोखे आंदोलन । आरोग्य सुविधा मिळत नसल्याने आंदोलन

श्रीगोंदा । वीरभूमी - Apr 23, 2021 • 12:00 AM 1265 views
गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यशासनाला कोरोनाची दुसरी लाट येणार आहे, अशी माहिती वैज्ञानिकाकडून मिळाली असताना देखील महाविकास आघाडी सरकारने कुठलीही ठोस उपाययोजना केल्या नाहीत.कोरोनामुळे राज्यातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत.

रेमडेसिविर इंजेक्शन नाही, बेड नाही, ऑक्सिजन तसेच स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी सुद्धा नंबर लावावे लागतात. इतकी दयनीय अवस्था आज राज्यातील जनतेवर आलेली आहे. याचा निषेध म्हणून दि. 23 रोजी स्मशानभूमीत राज्य शासनाच्या पुतळ्याचे रयत क्रांती संघटनेच्या वतीने दहन करून हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे, माणिक गाडे, अशितोष गाडे, अनिल मांडे, अभय मांडे, प्रेम मांडे, श्रीकांत मांडे आदी उपस्थित होते.

यावेळी मांडे म्हणाले की शासन फक्त आरोप प्रत्यारोप करणे व भ्रष्टाचार करण्यातच दंग आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न, कोरोना रुग्णालयातील सर्व प्रश्न, तसेच लॉकडाउन केल्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना अजून कोणतीही मदत नाही. या सर्व गोंधळातील कारभारामुळे जनता भयभीत झाली असून, राज्यातील जनतेला कोणीच वाली राहिलेला नाही.

कोरोना रुग्णांना उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात, एखाद्या गरीब घरातील कोणा व्यक्तीस कोरोनाची लागण झाली तर त्या रुग्णास घरातील नातेवाईक खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नेतात. त्यावेळेस हॉस्पिटल मधील डॉक्टर 50 हजार रुपये डिपॉझिट करा असे सांगतात.

तसेच वर्षभरापासून कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. या कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे. या गंभीर बाबींकडेसुद्धा राज्य शासनाचे लक्ष नाही. जनतेच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेतर्फे स्मशानभूमीत राज्य शासनाच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन यशस्वीपणे केल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply