Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

डॉक्टरांनी कोरोना बाधितांच्या मनातील भिती दूर करण्याचे काम करावे

जि. प. सदस्या हर्षदा काकडे । चापडगाव येथे जनशक्ती कोविड सेंटरचे उद्घाटन

शेवगाव, बोधेगाव । वीरभूमी- Apr 24, 2021 • 12:00 AM 1704 views
कोरोना बाबतच्या अफवा व त्याबद्दलची रुग्णांच्या मनातील भीती लक्षात घेता डॉक्टरांनी रुग्णांना मानसिक धीर देण्याचे काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे जनशक्ती कोविड केअर सेंटरचे उद्घाटन चापडगाव हायस्कूल येथे करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना जि. प. सदस्या सौ. काकडे बोलत होत्या.

जनशक्तीचे हे दुसरे कोविड सेंटर असून पहिले कोविड सेंटर अमरापूर येथे सुरू आहे. काकडे दांम्पत्यांनी शिक्षण सनस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले असून ते वाखानन्याजोगे आहे.

कोविड सेंटर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. शिवाजीराव काकडे होते. याप्रसंगी डॉ. श्वेता फलके/सूर्यवंशी, डॉ. जी. बी. पाडळे, डॉ.आर. बी. पाटील, डॉ. एस. टी. काटे, डॉ. पी. जे. नेमाने, डॉ. एम. व्ही. गमे, सरपंच शहादेव पातकळ, उपसरपंच सुरेश नेमाने, स्वभिमानीचे प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे, कल्याणराव नेमाने, नवनाथ ढाकणे, गणेश ढाकणे, अशोक ढाकणे, अण्णासाहेब गोरे, भारत लांडे, रामकिसन सांगळे, सुखदेव खंडागळे, नवनाथ खेडकर, भाऊसाहेब कणसे, रावसाहेब लांडे, संतोष गायकवाड, गणेश दारूणकर, अशोक गाढे, लक्ष्मण पातकळ, भास्कर वाल्हेकर, अशोक औटी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सौ. काकडे म्हणाल्या की, तालुक्यात कोविड रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अ‍ॅड. काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अमरापूर येथे व आता चापडगाव येथे कोविड सेंटर चालू करत आहोत. यामध्ये गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अमरापूर व चापडगाव येथील कोविड सेंटर सुरु होण्यासाठी डॉ.श्वेता फलके यांचा मोठा वाटा आहे.

आबासाहेबांचा वारसा व त्यांनी दिलेली ध्येय धोरणांचे पालन करत आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी कामे करत आहोत. आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील सर्व कर्मचारी घटक मिळून रुग्णांसाठी राहणे, दोन वेळेचे जेवण व चहा, नाष्टा इ. व्यवस्था आम्ही करत आहोत. डॉक्टरांनी रुग्णांचे मनोधैर्य वाढवावे व रुग्णांची बाहेर होणारी आर्थिक लूट थांबवावी, असे आवाहन डॉक्टरांना केले.

डॉ. गमे म्हणाले, आम्हाला या कोविड सेंटर चालू करण्यासाठी अ‍ॅड. काकडे यांनी जी मदत केली आहे, ती खूप मोठी आहे. त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवणार आहोत.

प्रशांत भराट म्हणाले की, अ‍ॅड. काकडे दाम्पत्यांनी आजची तालुक्याची परिस्थिती ओळखून अमरापूर व चापडगाव येथे कोविड सेंटर चालू केले आहे. लोकहिताची कामे ते सतत करत असतात. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्यासोबत आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी. एन. नेहुल यांनी केले तर आभार के. व्ही. ढोले यांनी मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply