Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोनाचा नगरकरांना दिलासा

रविवारच्या तुलनेत आकडेवारी घटली ; आज आढळले 2866 कोरोना बाधित

अहमदनगर । वीरभूमी - Apr 25, 2021 • 12:00 AM 2305 views
दिवसेंदिवस वाढत्या कोरोना बाधितांच्या चिंतेतून आज नगरकरांना काहीसा दिलासा मिळाला. रविवारी अ‍ॅक्टिव कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटल्यानंतर आजही कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. आज सोमवारी जिल्ह्यात 2866 कोरोना बाधित आढळून आले.

काही दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा दिवेंदिवस वाढत होता. राज्यासह जिल्ह्यात कडक लॉकडाऊन व विकेंड लॉकडाउन नंतर आज कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट झाल्याने काहीसा दिलासा मिळावा. आज जिल्ह्यात 2866 कोरोना बाधित आढळले.

नागरिकांनी अशाचप्रकारे नियम पाळले तर आपण लवकरच कोरोनाचा हरवू शकू, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे. मात्र दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाऊननंतर आज सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने नागरिकांनी काही ठिकाणी गर्दी केली होती. यामुळे अशीच गर्दी राहीली तर कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची भिती व्यक्त होत आहे.

नगर शहराचा आकडा आज निम्म्याने घटला आहे मात्र काही तालुक्यांची आकडेवारी वाढली आहे. आज कोपरगाव तालुका वगळता इतर तालुक्याची आकडे वारी शंभरच्या पुढे तर काही तालुक्याची आकडेवारी दोनशेच्या पुढे गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज सोमवारी जिल्ह्यात 2866 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1608, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 642 तर अँटीजेन चाचणीत 616 असे 3493 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 469 वर आला असून संगमनेर 392, अकोले 277, शेवगाव 234, कर्जत 183, राहाता 159, नगर ग्रामीण 157, पारनेर 126, पाथर्डी 126, नेवासा 124, राहुरी 120, श्रीगोंदा 115, श्रीरामपूर 101, जामखेड 100, भिंगार कन्टेंमेंट 72, कोपरगाव 72, इतर जिल्हा 26, मिलटरी हॉस्पिटल 12, इतर राज्य 01 असे रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply