Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

चिंतादायक दिलासा; रुग्ण बरे होण्याची टक्केवारीबरोबरच मृत्यूदरही वाढला

चिंतादायक दिलासा; रुग्ण बरे होण्याची टक्केवारीबरोबरच मृत्यूदरही वाढला

अहमदनगर । वीरभूमी- Apr 27, 2021 • 12:00 AM 1723 views
जिल्ह्यात आज सलग तिसर्‍या दिवशी मंगळवारी 2655 कोरोना बाधित आढळल्यानंतर सायंकाळी तब्बल 2725 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज सलग तिसर्‍या दिवशी बाधित आढळलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या घटली आहे. कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांची टक्क्ेवारीतही वाढ झाली असून ती आता 85.08 एवढी झाली आहे.

तसेच कोरोनाने मृत्यूच्या दरातही आज वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात तब्बल 70 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 40 हजार 711 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणात कालच्या पेक्षा वाढ झाली असली तरी मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सोमवारी 84.80 टक्के होते ते आज मंगळवारी 85.08 टक्के झाले आहे. यामुळे सध्या उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या घटली असून ती आता 22 हजार 700 इतकी झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असतांना आज सलग दुसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 622, अकोले 90, जामखेड 27, कर्जत 158, कोपरगाव 112, नगर ग्रामीण 272, नेवासा 182, पारनेर 145, पाथर्डी 91, राहाता 209, राहुरी 150, संगमनेर 139, शेवगाव 108, श्रीगोंदा 104, श्रीरामपूर 225, कॅन्टोन्मेंट 20, मिलिटरी हॉस्पिटल 70 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

यामुळे बरे झालेली रुग्ण संख्या तब्बल 1 लाख 40 हजार 411 वर पोहोचली आहे. तर सध्या 22 हजार 700 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या चोवीस तासात 70 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून आज पर्यंत 1919 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

नागरिकांनी कोरोना विषयी असलेली भिती दूर करून धाडसाने उपचार करून घेतल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो हे या आकडेवारीतून समोर आले आहे. यामुळे नागरिकांनी वेळेवर उपचार घ्यावेत, नियमित मास्क वापरावा व शासनाने जाहीर केलेले निर्बंध पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सलग तिसर्‍या दिवशी जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या घटल्याने समाधान व्यक्त होत आहे. तर कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply