Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

कोविड चाचण्यांसाठी शिबिराचे आयोजन करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोविड चाचण्यांसाठी शिबिराचे आयोजन करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर । वीरभूमी- Apr 30, 2021 • 12:00 AM 1161 views
कोविडच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोविड रुग्णांना वेळेतच शोधून त्यांच्यावर योग्य उपचार केल्यास कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्यास मदत होईल. त्यासाठी नेवासा तालुका प्रशासनाने आवश्यकता पडल्यास तालुक्यात कोविड चाचणी शिबिरांचे आयोजन करुन मोठ्या प्रमणावर चाचण्या कराव्यात असे निर्देश ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिले.

नेवासा तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती, प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती येथील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत उपस्थित प्रशासनातील अधिकार्‍यांना मार्गदशन करताना ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसलिदार रुपेशकुमार सुराणा, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक दिपाली काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय करे, गट विकास अधिकारी शेखर शेलार आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांशी संवाद साधून तालुक्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. कोविड चाचण्यांसाठी किट उपलब्ध करुन देणे, कोविड उपचारावरील औषधांचा साठा आणि वितरण, नागरिकांचे लसीकरण आणि रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करुन देण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याची सूचना मंत्री श्री.मुश्रीफ यांनी अधिकार्‍यांना केली.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी, आरोग्य सुविधांचा वापर सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांसाठी प्राधान्याने करावा अशी सूचना केली. शनिशिंगणापूर येथे सर्व सुविधांनी युक्त कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरसाठी ऑक्सिजनचा प्लँट त्वरित सुरु करण्याची मागणी त्यांनी केली.

तहसिलदार रुपेशकुमार सुराणा आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित सूर्यवंशी यांनी कोविड रुग्णांची सद्य:स्थिती आणि तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यात दोन कोविड केअर सेंटर, नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शनिशिंगणापूर येथील कोविड केअर सेंटर येथे मिळून जवळपास सातशे पन्नास बेड्सची उपलब्धता असल्याचे सांगितले. बैठकीला विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, आरेाग्य सेवक उपस्थित होते.

श्रीरामपूर येथे आढावा बैठक
श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेतला. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यावेळी उपस्थित होते.

तालुका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांसोबत शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन केल्यास कोरोना नियंत्रणात ठेवता येईल अशी अपेक्षा मंत्रीमहोदयांनी व्यक्त केली. खासदार सदाशिव लोखंडे यांनी अधिकार्‍यांना मागदर्शन केले. आमदार लहू कानडे यांनी लॉकडाऊन कालावधीतही रुग्णसंख्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली आणि सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply