Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

वय वर्षे 80; दाम्पत्यांची कोरोनावर मात

इतरांना दिला हा कानमंत्र

बोधेगाव । उद्धव देशमुख- May 04, 2021 • 12:00 AM 2422 views
कोरोनाच्या आजारात व्यक्तीने प्रबळ ईच्छाशक्ती आणि आत्मविश्वास बाळगळा तर आजारावर विजय मिळवता येउ शकतो. असा कानमंत्र शेकटे बुद्रुक येथील आप्पासाहेब गरड व त्यांच्या पत्नी शकुंतला गरड या 80 वर्षीय वृद्ध दाम्पत्यांनी दिला आहे. नुकतीच या दाम्पत्यांने संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे सहकारी साखार कारखान्याच्या बोधेगाव येथील कोविड केअर सेंटर येथे कोरोनावर यशस्वीरीत्या मात केल्यानंतर दिला.

आजाराच्या वेळी रक्ताच्या नात्यातील व्यक्ती जवळ असणे गरजेचे असताना, कोरोना आजारात मात्र कोणीही जवळ असत नाही. याच मानसिकतेत कोरोनाग्रस्त रुग्ण मानसिकदृष्ट्या खचून जातो. एकाकी पडल्याचे त्याला जाणवते. यातून तो मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो. प्रसंगी त्याला मृत्यूलाही सामोरे जावे लागते.

कोरोना आजार हा खूप मोठा नसून, सर्वत्र बनवलेले नकारात्मक वातावरण मात्र घातक ठरत आहे. मात्र आवश्यक ती काळजी, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार तसेच कोविड सेंटरवर असणार्‍या भौतीक सुखसुविधेच्या आधारावर आणि उंच मनोबल, धैर्य राखून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात करणे शक्य आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केदारेश्वर कोविड केअर सेंटरवर उपचार घेत असलेले 75 रुग्णापैकी 31 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामध्ये शेकटे बुद्रुक येथील आप्पासाहेब गरड व त्यांच्या पत्नी शकुंतला गरड या 80 वर्षाच्या वृद्ध दाम्पत्यांनी 8 दिवस उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरित्या मात करून त्यांना सोमवार दि. 03 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कारखाना प्रशासनाने त्या वृद्ध दाम्पत्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना घरी जाण्यासाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला आहे.

दरम्यान बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या संकल्पनेतून, कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली यसेच तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या 100 बेडच्या केदारेश्वर कोविड केअर सेंटरमध्ये सुरू झाल्यापासून 75 रुग्ण दाखल झाले होते. त्यांपैकी 31 रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आल्याने सर्वत्र या केदारेश्वर कोविड सेंटरचे कौतुक होत आहे.

यावेळी डॉ. प्रमोद जाधव, डॉ. चंद्रशेखर घनवट, डॉ. दीपक फुंदे, डॉ. जैन, नंदकुमार गुठे, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, चीफ अकौंटट तीर्थक्षेत्र घुंगरड, अंबादास दहिफळे, विक्रम केदार, संजय चेमटे, गोविंद केकाण, रामनाथ बटुळे यांच्यासह आदी कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते.

संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. प्रतापकाका ढाकणे यांनी देखील मोबाईल वरून या वृद्ध दाम्पत्यास शुभेच्छा देऊन येथील डॉक्टरचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व रुग्णांना काळजी घेण्याचे आवाहन देखील अ‍ॅड. ढाकणे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply