Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यात आज आढळले 4139 कोरोना बाधित

पाथर्डी, अकोले, जामखेड, श्रीरामपूर वगळता इतर तालुके 200 च्या पुढे

अहमदनगर । वीरभूमी - May 06, 2021 • 12:00 AM 1938 views
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज आढळलेल्या बाधितांची आकडेवारीमध्ये घट झाली आहे. आज गेल्या चोवीस तासात तब्बल 4139 कोरोना बाधित आढळले.

कमी झालेली आकडेवारी पुन्हा वाढू लागली आहे. आज कोरोना बाधितांची संख्या पुन्हा चार हजाराच्या पुढेच राहीली आहे. जिल्ह्यात आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहरापाठोपाठ श्रीगोंदा तालुक्याची आकडेवारी 400 च्या पुढे गेली आहे. त्याचप्रमाणे पारनेर, कोपरगाव व नगर ग्रामीणचा आकडा 300 च्या पुढेच आहे.

तर आज पाथर्डी, अकोले, जामखेड, श्रीरामपूर वगळता इतर तालुके दोनशेच्या पुढे आहेत. यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू सुरू असतांनाही कोरोना बाधितांची संख्या झटपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 951, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 2140 तर अँटीजेन चाचणीत 1048 असे 4139 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर 674, श्रीगोंदा 436, नगर ग्रामीण 359, पारनेर 334, कोपरगाव 321, राहाता 264, राहुरी 263, संगमनेर 210, कर्जत 205, शेवगाव 205, नेवासा 201, पाथर्डी 164, अकोले 145, इतर जिल्हा 135, जामखेड 107, श्रीरामपूर 64, भिंगार कन्टेन्मेंट 48, मिलटरी हॉस्पिटल 01, इतर राज्य 03 असे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जनता कर्फ्यू असतांनाही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply