Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

नगरकरांना दिलासा; संगमनेर, अकोलेची चिंता वाढली

नगरकरांना दिलासा; संगमनेर, अकोलेची चिंता वाढली

अहमदनगर । वीरभूमी - May 08, 2021 • 12:00 AM 2452 views
सर्वात जास्त कोरोना बाधित आढळणार्‍या नगर शहराचा आकडा आज प्रथमच दुसर्‍या स्थानावर गेला आहे. मात्र संगमनेरने प्रथम क्रमांक व अकोलेने तृतीय क्रमांकावर येत चिंता वाढवली आहे.

आज शनिवारी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील आकडेवारी घटल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3612 वर आला आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाठशिवणीचा खेळ खेळत असून दोन दिवस जास्त तर दोन दिवस कमी अशी कोरोना बाधितांची संख्या कमी जास्त होत आहे. आज प्रथमच नगर शहराची आकडेवारी दुसर्‍या स्थानावर आली आहे. मात्र संगमनेरने प्रथम तर अकोलेने तिसर्‍या स्थानावर येत अकोले, संगमनेरकरांची चिंता वाढवली आहे.

कोरोना सनसर्गाची साखळी तुटण्यासाठी अनेक तालुक्यात कडक लॉकडाऊन असतांनाही अत्यावश्यक सेवा बंद करून जनता कर्फ्यू पाळला जात आहे. मात्र तरीही कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये शेवगाव, जामखेडची आकडेवारी शंभरच्या आत आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र मिळणारा हा दिलासा क्षणभराचा ठरत असल्याचा अनुभव असल्याने उद्या पुन्हा किती वाढतात याचीची चिंता लागून असते.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1018, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1945 तर अँटीजेन चाचणीत 649 असे 3612 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर 442, नगर शहर 428, अकोले 364, नगर ग्रामीण 274, राहुरी 264, पारनेर 255, नेवासा 241, राहाता 235, श्रीरामपूर 229, कर्जत 227, पाथर्डी 193, कोपरगाव 146, श्रीगोंदा 122, इतर जिल्हा 64, भिंगार कन्टेन्मेंट 58, शेवगाव 38, मिलटरी हॉस्पिटल 15, जामखेड 13, इतर राज्य 04 असे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू आहे. तरीही या ठिकाणीही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन हतबल होत आहे. मात्र नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घेतले तर कोरोनावर विजय मिळवता येईल, असा विश्वास असल्याने दिलासा मिळत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply