Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आज जिल्ह्यात आढळले 3328 कोरोना बाधित

शेवगाव तालुक्यात कोरोना बाधितांचा उच्चांक

अहमदनगर । वीरभूमी - May 09, 2021 • 12:00 AM 3043 views
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आज रविवारी 3328 पर्यंत आला आहे. दोन दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असल्याने नगरकरांना दिलासा मिळत आहे. मात्र शनिवारी ज्या तालुक्याचा आकडा कमी होता तो आज पुन्हा वाढला आहे. यामुळे शिवनापाणीचा खेळ सुरूच असल्याचे दिसून येते.

नेहमी सर्वात जास्त आकडेवारी असलेल्या नगरची आकडेवारी शनिवारपासून कमी झाली आहे. ती आज स्थिर राहीली मात्र इतर तालुक्याच्या तुलनेत नंबर एकवरच आहे.

त्याखालोखाल नगर ग्रामीणचा आकडा दुसर्‍या स्थानावर तर तिसर्‍या स्थानावर शेवगाव तालुक्याने झेप घेतली असून आजपर्यंतचा सर्वोच्च आकडा 327 वर पोहोचला आहे. त्याखालोखाल राहाता, जामखेड, नेवासा, पारनेर, राहुरी श्रीगोंदा असे क्रमवारी राहीली आहे. शनिवारी क्रमांक एकवर असलेला संगमनेर व अकोलेची आकडेवारी घटली आहे. अकोले तालुका वगळता इतर तालुक्यांची आकडेवारी वगळता इतर तालुके शंभरच्या पुढे आहेत.

कोरोना सनसर्गाची साखळी तुटण्यासाठी अनेक तालुक्यात कडक लॉकडाऊन असतांनाही अत्यावश्यक सेवा बंद करून जनता कर्फ्यू पाळला जात आहे. मात्र तरीही कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1220, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1416 तर अँटीजेन चाचणीत 692 असे 3328 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर 421, नगर ग्रामीण 342, शेवगाव 327, राहाता 296, जामखेड 275, नेवासा 213, पारनेर 196, संगमनेर 190, पाथर्डी 175, श्रीगोंदा 167, श्रीरामपूर 167, कोपरगाव 128, कर्जत 109, इतर जिल्हा 66, अकोले 53, भिंगार कन्टेन्मेंट 26, इतर राज्य 04 असे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू आहे. तरीही या ठिकाणीही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन हतबल होत आहे. मात्र नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घेतले तर कोरोनावर विजय मिळवता येईल, असा विश्वास असल्याने दिलासा मिळत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply