Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

जिल्ह्यातील कोरोना बाधितांसाठी काँग्रेसच्यावतीने संगमनेरात सहाय्यता केंद्र

जिल्ह्यातील कोरोना बाधितांसाठी काँग्रेसच्यावतीने संगमनेरात सहाय्यता केंद्र

संगमनेर । वीरभूमी - May 10, 2021 • 12:00 AM 1147 views
कोरोनाच्या वाढत्या संकटांमध्ये राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मदतीकरीता कृतिशील उपायोजना केल्या आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना तातडीने मदत मिळणे करिता संगमनेर येथील यशोधन कार्यालयात 24 तास कार्यरत अशी हेल्पलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

यशोधन मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे आज आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा कोरोना मदत व सहाय्यता केंद्र या कोरोना वॉररूम उद्घाटन करण्यात आले. यावेळी अहमदनगर शहर अध्यक्ष किरण काळे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, समन्वयक -ाानदेव वाफारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, शहराचे युवक अध्यक्ष निखिल पापडेजा, प्रा. बाबा खरात, नवनाथ महाराज आंधळे, सचिन खेमनर, पी. वाय. दिघे, विजय हिंगे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, कोरोना संकटात काँग्रेस पक्षाने श्रीमती सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर अत्यंत प्रभावी काम केले आहे. राज्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षीही आणि यावर्षी सुद्धा काँग्रेस पक्ष पक्षातील कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने जनतेला मदत करत आहेत.

ना. बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्या व संगमनेर तालुक्यातील कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत करणे, औषधांची उपलब्धता करणे, शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्वांसाठी बेड उपलब्ध करणे. याच बरोबर कोरोना रूग्णांच्या सोयीसाठी संगमनेरमध्ये 500 बेडचे अद्यावत कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. प्रत्येक तालुक्यात सातत्याने आढावा घेऊन कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला व कार्यकर्त्यांना सूचना देऊन क्रियाशील बनवले आहे.

या 24 तास हेल्पलाईन केंद्रामुळे विविध तालुक्यातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना साधी बेड, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्धते साठी मदत मिळवणे, रुग्णवाहिका, प्लाझ्मासाठी मदत, अरुण रूग्णांसाठी औषधे मिळवणे अशा विविध सुविधांसाठी तत्परतेने मदत केली जाणार आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच 24 तास हेल्पलाईन केंद्र असून कोरोनाला हरविणे हाच आपल्या सर्वांचा संकल्प असून यशोधन मधील कोरोना वाररूम ही जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे ते म्हणाले.

शहराध्यक्ष किरण काळे म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना संकटात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे सातत्याने जनतेच्या मदतीसाठी तत्पर आहेत. राज्याचा कारभार सांभाळताना सुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ते काम करत आहेत. या वॉररूममुळे जिल्ह्यातील सर्वांना वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले असल्याचे ते म्हणाले.

सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, हे मानवजातीवरील संकट आहे. याकडे पहाताना कोणीही निष्काळजीपणा करू नका. आपण जितकी काळजी घेऊ तितके कोरोनापासून सुरक्षित राहू. ज्यांना काही वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी मार्गदर्शन हवे असेल त्यांनी या वॉररूमशी तातडीने संपर्क करावा. सचिन गुजर म्हणाले की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोना लसीकरणाकरीता स्वत:ची एक वर्षाचे मानधन देऊन सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

या वाररूम मधून 24 तास मदत सुरू राहणार असून यामध्ये प्रत्येक तालुक्यासाठी मदती करता प्रशिक्षित चार व्यक्ती कार्यरत राहणार असून प्रत्येक तालुक्यासाठी संगणका सह त्यासंबंधी तालुक्यातील सर्व हॉस्पिटल, त्यांचे फोन नंबर, तेथील बेडची व्यवस्था, संपर्क व मदत यंत्रणा, प्रशासन अधिकारी ,कोरोना योद्धे याबाबतची अद्ययावत माहिती सह स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

संगमनेर, अकोले, कोपरगाव व राहाता या तालुक्यांसाठी 9370589017, व 8446525901 तर नगर, राहुरी, अहमदनगर शहरा करता 9370693309 व 9370577868 तसेच कर्जत, जामखेड, श्रीगोंदा व पारनेर या तालुक्यांत करिता 9370841417 व 9370839096 आणि पाथर्डी, शेवगाव, नेवासा व श्रीरामपूर या तालुक्यात करता 9370682375 व 9370877503 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply