Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

जिल्ह्यात आज आढळले 2882 कोरोना बाधित

सर्व तालुक्यांची आकडेवारी शंभरच्या पुढे

अहमदनगर । वीरभूमी - May 16, 2021 • 12:00 AM 2296 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज तीन हजाराच्या आत आल्याने दिलासादायक चित्र निर्माण होऊ लागले आहे. आज रविवारी आढळलेल्या कोरोना बाधितांची संख्या घटली असून आज जिल्ह्यात 2882 कोरोना बाधित आढळले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये दोन दिवस घट तर दोन दिवस वाढ झाल्यानंतर आज पुन्हा घट झाली आहे. शनिवारच्या तुलनेत आज 362 ने घट झाली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक आकडा हा संगमनेर तालुक्याचा असून हा आकडा 310 असून इतर तालुके 300 चे आत आहेत. मात्र सर्वच तालुक्यांची आकडेवारी शंभरच्या पुढे असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कायम असून आज 362 ने घट झाली आहे. अशीच आकडेवारी कमी होत राहीली तर संपूर्ण जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 224, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1408 तर अँटीजेन चाचणीत 1250 असे 2882 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर 310, नगर ग्रामीण 270, कर्जत 209, श्रीगोंदा 190, नेवासा 188, शेवगाव 188, राहुरी 178, नगर शहर 174, श्रीरामपूर 168, पाथर्डी 165, अकोले 164, राहाता 162, पारनेर 160, कोपरगाव 154, जामखेड 142, इतर जिल्हा 47, भिंगार कँटोन्मेंट 12, इतर राज्य 01 असे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या जनता कर्फ्यू असतांनाही कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply