Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई

दिलासा ः कोरोना बाधितांचा आकडा दोन हजाराच्या आत

संगमनेर 354, अकोले 204, राहुरी 185, श्रीरामपूर 148

अहमदनगर । वीरभूमी - May 22, 2021 • 12:00 AM 2047 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीमध्ये घट होऊन अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आज प्रथमच दोन हजाराच्या आत आली आहे. आज शनिवार दि. 22 रोजी जिल्ह्यात 1856 कोरोना बाधित आढळले. यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला असून गेल्या चोवीस तासात 636 रुग्णांनी घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत सध्या हळु हळु घट होऊन लागल्याने नगरकरांना काहीअंशी दिलासा मिळत आहे. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आज प्रथमच एकुण आकडेवारीचा आकडा दोन हजाराच्या आत आली आहे. मात्र संगमनेरची आकडेवारीत वाढ होऊन ती 354 वर जावून ठेपली आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेर पाठोपाठ अकोले तालुक्याचा क्रमांक लागतो. त्याखालोखाल राहुरी 185, श्रीरामपूर 148, नगर शहर 126, पाथर्डी व पारनेर 116 अशी आहे. तर नेवासा, कर्जत, राहाता, श्रीगोंदा, कोपरगाव, शेवगाव, जामखेड या तालुक्यांची आकडेवारी शंभरच्या आत आली आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 140, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 869 तर अँटीजेन चाचणीत 847 असे 1856 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली आकडेवारी- संगमनेर 354, अकोले 204, राहुरी 185, श्रीरामपूर 148, नगर शहर 126, पारनेर 116, पाथर्डी 116, नगर ग्रामीण 95, नेवासा 92, कर्जत 91, राहाता 86, श्रीगोंदा 76, कोपरगाव 69, शेवगाव 47, जामखेड 28, इतर जिल्हा 22, भिंगार कँटोन्मेंट 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावा, हात स्वच्छ धुवावे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply