Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कोरोना बाधितांच्या आकड्यात मोठी घट

सर्व तालुक्याची आकडेवारी दोनशेच्या आत; आठ तालुक्यांचा आकडा दोन अंकी

अहमदनगर । वीरभूमी - May 27, 2021 • 12:00 AM 2329 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आज 597 ने घट झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात 1610 कोरोना बाधित आढळले आहेत. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर एकुण कोरोना बाधितांचा आकडा घटल्याने समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत कधी घट तर कधी वाढ होत असल्याचे चित्र आहे. काल बुधवारी 16 न वाढ झाल्यानंतर आज गुरुवारी 597 ने घट झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीत नेवासा तालुका प्रथम क्रमांकावर आला आहे. मात्र ती आकडेवारीही दोनशेच्या आत असल्याने दिलासा मिळाला आहे. तर आज आढळलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीत तब्बल आठ तालुक्यांचा आकडा शंभरच्या आत आहे.

जिल्ह्यातील एकुण आकडेवारी कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांनी असाच संयम पाळला तर लवकरच संपूर्ण जिल्हा कोरोना मुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आज प्रथमच आकडा दीड हजार पर्यंत आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 201, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 738 तर अँटीजेन चाचणीत 671 असे 1610 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली आकडेवारी- नेवासा 187, संगमनेर 127, राहुरी 126, कोपरगाव 123, शेवगाव 123, अकोले 122, नगर शहर 112, श्रीरामपूर 95, पारनेर 90, नगर ग्रामीण 90, राहाता 86, पाथर्डी 86, जामखेड 82, श्रीगोंदा 73, कर्जत 71, इतर जिल्हा 14, भिंगार 03 असे कोरोना बाधित आढळले आहेत.

कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी नियमाचे पालन करावे, विनाकारण घराबाहे पडू नये, नियमित मास्क लावावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित हात स्वच्छ धुवावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply