Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आजच्या आकडेवारीत थोडीशी वाढ

संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा शंभरी पार; उर्वरित तालुक्यांचा आडकडा शंभरच्या आत

अहमदनगर । वीरभूमी - Jun 01, 2021 • 12:00 AM 2229 views
अहमदनगर जिल्ह्याला सोमवारी मोठा दिलासा मिळाल्यानंतर आज मंगळवारी सोमवारच्या तुलनेत 240 ने वाढ झाली आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात एकुण 1152 कोरोना बाधित आढळले आहेत. आज आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा हजारी पार गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर सोमवारी दरदिवशी आढळणार्‍या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत आला होता. मात्र आज मंगळवारी या आकडेवारीत थोडीशी वाढ झाली आहे. आज आढळलेल्या आकडेवारीत संगमनेर सर्वोच्च स्थानावर कायम राहीले असून त्या खालोखाल नेवासा कायम असून तिसर्‍या स्थानावर श्रीगोंद्याची एंन्ट्री झाली आहे. तर शेवगावचा क्रमांक एकने घसरत चौथ्या स्थानावर आले आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 375, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 423 तर अँटीजेन चाचणीत 349 असे 1152 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे- संगमनेर 153, नेवासा 137, श्रीगोंदा 118, शेवगाव 89, पारनेर 86, अकोले 82, राहाता 73, श्रीरामपूर 71, नगर ग्रामीण 66, जामखेड 61, राहुरी 54, पाथर्डी 51, कर्जत 38, नगर शहर 36, कोपरगाव 20, इतर जिल्हा 12 भिंगार 05 असे कोरोना बाधित आढळले आहे.

नागरिकांनी असाच संयम ठेवल्यास आकडेवारी कमी होऊन संपूर्ण जिल्हा कोरोना मुक्त होईल. यासाठी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply