Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांचा आकडा घटला

सर्वच तालुके 38 च्या आत । नगर ग्रामीणसह शहराचा आकडा एक अंकी

अहमदनगर । वीरभूमी- Jun 19, 2021 • 12:00 AM 2164 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये आज मोठी घट झाली आहे. आज शनिवारी जिल्ह्यात एकुण 309 कोरोना बाधित आढळले आहेत. घटलेल्या आकडेवारीमुळे जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे.

मागील काही आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीमध्ये घट होत आहे. गेली दोन-तीन दिवस वाढलेल्या आकडेवारीनंतर आज पुन्हा कोरोना बाधितांमध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे आज आढळलेल्या बाधितांचा आकडा शुक्रवारच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे.

आज आढळलेल्या आकडेवारीत शेवगाव तालुका टॉपवर आहे. मात्र ही आकडेवारी 38 एवढी असल्याने प्रथम क्रमांकावर असून देखील दिलासा मिळत आहे. त्याखालोखाल पारनेर, जामखेड, पाथर्डी असा क्रमांक लागतो. तर नगर शहर, नगर ग्रामीण व भिंगारचा आकडा एक अंकावर आला आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 14, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 180 तर अँटीजेन चाचणीत 115 असे 309 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- शेवगाव 38, पारनेर 37, जामखेड 30, पाथर्डी 29, श्रीरामपूर 27, राहुरी 21, श्रीगोंदा 20, नेवासा 18, संगमनेर 18, राहाता 14, कोपरगाव 13, अकोले 12, कर्जत 12, नगर ग्रामीण 08, इतर जिल्हा 06, नगर शहर 05, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळले आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटत चालल्याने नगरकरांना दिलासा मिळत आहे. अशाप्रकारे प्रत्येकाने नियमित तोंडाला मास्क लावावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित स्वच्छ हात धुवावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply