Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

साठवणूक मर्यादेच्या निषेधार्थ आडतेबाजार असोसिएशनचा आज बंद

साठवणूक मर्यादेच्या निषेधार्थ आडतेबाजार असोसिएशनचा आज बंद

अहमदनगर । वीरभूमी - Jul 06, 2021 • 12:00 AM 786 views
केंद्र सरकारने अचानक कडधान्ये, दाळी यावर कोणताही विचार न करता साठवणूक मर्यादा लागू केली आहे. या प्रकारामुळे देशभरातील व्यापार्‍यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर नगर शहरातील आडते बाजार मर्चंटस् असोसिशनतर्फे मंगळवारी (6 जुलै) बंदचा इशारा दिला.

असोसिशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा म्हणाले, कडधान्ये व दाळींवर साठवणूक मर्यादेचा निर्णय घाईत घेण्यात आला. या प्रकारामुळे देशभरातील व्यापार्‍यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अनेक राज्यांतील कृषी उत्पन्नांचे व्यवसाय पूर्णपणे बंद पडले असून नगरमधील सर्वात मोठ्या आडतेबाजार मर्चंट असोसिएशनकडून या नव्या नियमांचा निषेध करण्याच्या हेतुने एकदिवसीय लाक्षणिक बंदचे आवाहन केले.

या बंदमध्ये शहरातील दाळमंडई, आडतेबाजार, दाणेडबरा, मार्केटयार्ड परिसरातील व्यवसायिक सहभागी होणार आहेत. तसेच कडधान्याचा व्यापार बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचेही कळवण्यात आले. जिल्ह्यातील तालुका मार्केटमधील व्यापार्‍यांनीही या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच शेतकर्‍यांनी व ग्राहकांनी या बंदची नोंद घ्यावी.

याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलिस अधीक्षक, उपनिबंधक कार्यालयालाही कळवण्यात आले आहे, असे चोपडा यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply