Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेतकर्‍यांच्या वीजेसंबधी समस्या तातडीने सोडवाव्या

उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे । अहमदनगर जिल्ह्यात दहा सब स्टेशन उभारण्यात येणार

श्रीरामपूर । वीरभूमी - Jul 09, 2021 • 12:00 AM 801 views
महाविकास आघाडी शासनाने लागू केलेल्या ऊर्जा धोरणास शेतकऱी चांगला प्रतिसाद देत असून थकित वीज देयकांचा भरणा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर वीजेसंबधी समस्यांना शेतकर्यांना सामोरे जावे लागणार नाही याची महावितरणने दक्षता घेण्याचे निर्देश उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज श्रीरामपूर येथे दिले.

श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील वीज विषयक समस्यांचा आढावा घेण्यासाठी विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, करण ससाणे, श्रीरामपूरचे महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात उपस्थित होते.

उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या आढावा बैठकीत पदाधिकारी, नागरिक व शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नवीन वीज धोरणाद्वारे शेतकर्‍यांना थकित वीज देयकात भरीव सुट दिली असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यात दहा नवीन सब स्टेशन उभारण्यात येणार असून त्यापैकी दोन सब स्टेशनचा फायदा श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आणि शेतकर्‍यांना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीरामपूर शहर पाणी पुरवठा योजनेला अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश यावेळी मंत्रीमहोदयांनी दिले. महावितरणने शेतकर्‍यांना चांगल्या सुविधा देतानाच ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी शेतकर्‍यांना खर्च करण्यास सांगू नये अशी सक्त ताकीद दिली. नागरिक व शेतकर्‍यांनी चालू वीज बिल भरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. वीज विषयक समस्यांचा आढावा घेताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी त्या त्वरित सोडविण्याचे निर्देशित केले.

आमदार लहू कानडे यांनी ग्रामीण व शहरी भागातील वीज पुरवठा सुरळीत रहावा तसेच तालुक्यातील सबस्टेशनची संख्या वाढवावी अशी सूचना केली.

नगर परिषदेतर्फे पाणी पुरवठा योजनेच्या देयकाचा भरणा करण्यात येत असून वीज पुरवठा खंडित न करण्याची मागणी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी यावेळी केली. श्रीरामपूर शहरालगत सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी तालुक्यातील चालू असलेल्या व नियोजित योजनांचा तपशिल सादर केला. आढावा बैठकीत महावितरण कंपनीचे अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक आणि शेतकऱी सहभागी झाले होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply