Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

शेवगावमधील या मुंडे समर्थकांनी दिले राजीनामे

शेवगावमधील या मुंडे समर्थकांनी दिले राजीनामे

शेवगाव । वीरभूमी- Jul 12, 2021 • 12:00 AM 3150 views
खा. प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात डावलल्यामुळे नाराज झालेल्या मुंडे समर्थकांनी राजीनामे सत्र सुरू केले आहे. बीड पाठोपाठ पाथर्डी तालुक्यातील समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानंतर आज सोमवारी शेवगाव तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे दिले आहेत.

आता या राजीनामा दिलेल्या समर्थकांची समजुत काढण्यासाठी मंगळवारी पंकजा मुंडे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून राहीले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खा. डॉ. प्रितम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे नाराज भाजप पदाधिकार्‍यांचे राजीनामे सत्र आज सोमवारीही सुरुच होते. आज सोमवारी सकाळी शेवगाव तालुक्यातील मुंडे समर्थकांनी शहरातील मुंडे चौकामध्ये एकत्र येऊन आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे दिले.

आज राजीनामे दिलेल्या पदाधिकार्‍यांमध्ये भाजपाचे शेवगाव तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोढे यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा आशाताई गरड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गंगा खेडकर, युवा मोर्चाचे शेवगाव तालुकाध्यक्ष सचिन वारकड, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष उमेश भालसिंग, भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डमाळे, भाजपाचे सरचिटणीस संदीप वाणी, सरचिटणीस नवनाथ कवडे, केशव आंधळे, कार्यालयीन चिटणीस कैलास सोनवणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव भिसे, सुभाष बडधे, सुधीर जायभाये यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

तर या अगोदर गणेश कराड, कचरू चोथे, कमलेश गांधी, आंबादास ढाकणे, गुरुनाथ माळवदे आदींनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply