Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

मायंबा व मढी देवस्थान या सुविधेने जोडली जाणार

45 कोटी रुपये खर्चून होणार रोप-वे

पाथर्डी । वीरभूमी- Jul 15, 2021 • 12:00 AM 4188 views
देशातील नाथभक्तांच्या सोयीसाठी मायंबा व मढी देवस्थान समितीकडून संयुक्त उपक्रम हाती घेण्यात येत असून सुमारे 45 कोटी रुपये खर्चून दोन्ही देवस्थानांना जोडणारा रोप-वे केला जाणार आहे. हा राज्यातील एकमेव असा उपक्रम ठरणार आहे.

आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने दोन्ही देवस्थान समित्यांच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. मायंबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, मढी देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड, बबन मरकड, शिवजीत डोके आदी संयुक्त बैठकीला उपस्थित होते.

गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे नाथ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. येथून जवळच नाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी मायंबा (सावरगाव) येथे आहे. तेथून जवळच चैतन्य कानिफनाथाची मढी येथे संजीवन समाधी आहे. संपूर्ण परिसरात औषधी वनस्पती मुळे अत्यंत शुद्ध हवामान असते. पावसाळ्यामध्ये तर या परिसरात राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. दोन्ही देवस्थान समिती यांच्यातर्फे भाविकांना मोफत महाप्रसाद दिला जातो. मढी- मायंबा- वृद्धेश्वर अशी भ्रमंती एका दिवसात पूर्ण होते.

मायंबा देवस्थानची उंची जास्त असून अत्यंत अवघड असा रस्ता आहे. अलीकडील काही वर्षात सर्व देवस्थाने डांबरी रस्त्याने जोडली गेली तरी सोयीस्कर दळणवळण व्यवस्था नसल्याने अनेक भाविक मढी वरून दहा किलोमीटरचा घाट रस्ता पायी चालत मायंबाला जातात. धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनाला असलेला प्रचंड वाव व यातून संपूर्ण परिसराचा होणार सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून दोन्ही देवस्थान समित्यांनी संयुक्त विकास कामांचा निर्णय घेतला आहे.

शासनाच्या विविध योजनांची मदत घेऊन रोप-वे चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केले. वणी, गिरणार पर्वत आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या रोप-वे च्या सुविधेचा चर्चेतून आढावा घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी चे प्रस्ताव सादर करून या माध्यमातून संपूर्ण गर्भगिरी डोंगर रागाच्या परिसर निसर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून हाती घेऊन वृक्षारोपणाने या उपक्रमाचा प्रारंभ झाला. मायंबा समाधी मंदिर परिसरात व डोंगररांगांमधून वड, पिंपळ, लिंब आधी प्रकारची 44 हजार झाडे लावण्यासाठी देवस्थान समितीने यंत्रणा सज्ज केली आहे.

मढी देवस्थान व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाणार आहे. पुढील महिन्यात यासाठी पुन्हा बैठक आयोजित केली जाणार आहे.

मायंबा- मढी देवस्थान दरम्यान रोप-वे चे काम पूर्ण झाल्यावर आष्टी तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागाचे आर्थिक संबंध पाथर्डी, तिसगाव गावांबरोबर वाढतील. उपेक्षित गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन नगर तालुक्यातील आगडगाव, महाल, करंजी घाट, वृद्धेश्वर, मढी, मायंबा, तारकेश्वर, मोहटादेवी पासून येवलवाडी येथील जालिंदरनाथांची समाधी स्थानापर्यंत पर्यटन वाढणार असल्याची माहिती सावरगावचे सरपंच राजेंद्र म्हस्के यांनी दिली.

आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने सुरू असलेली विकास कामे मायंबा व परिसरात लक्षणीय ठरली आहेत. मूळ स्वरूपाला कुठेही धक्का न लागू देता परिसराचा सर्वांगीण विकास हाती घेताना, मढी देवस्थान समितीचे सहकार्य लाभणार असल्याने विकासाचा वेग वाढेल कोठेही बाजारू स्वरूप परिसराला येणार नाही. याची काळजी घेऊ, अशी माहिती मायंबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांनी दिली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply